
नाशिक । Nashik
सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नांदुर-शिंगोटे (Nandur Shingot) येथील एकलव्य नगरमध्ये आज सकाळी साडे सहाच्या सुमारास ४५ वर्षीय व्यक्तीवर बिबट्याने हल्ला (Leopard attack) केल्याची घटना घडली आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील रहिवासी सोमनाथ महादू मेंगाळ (Somnath Mahadu Mengal) (वय ४५) असे बिबट्याने हल्ला केलेल्या व्यक्तीचे नाव असून मेंगाळ हे आज सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर आपल्या वस्ती जवळील विहिरीकडे (Well) फेरफटका मारण्यासाठी जात होते.
त्यावेळी अचानकपणे रस्त्याच्याकडेला दबा धरून बसलेल्या दोन बिबट्यांपैकी एकाने मेंगाळ यांच्यावर हल्ला केला. या हल्यात मेंगाळ यांच्या पोटावर, डाव्या हातावर व डाव्या पायावर जखम झाली. त्यानंतर मेंगाळ यांना दोडी बुद्रुक (Dodi Budruk) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर (Primary Health Center) उपचार घेऊन घरी पाठविण्यात आले.
दरम्यान, तात्काळ या घटनेची माहिती स्थानिकांनी वनविभागाला (Forest Department) दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी (Forest Department Staff) घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिसराची पाहणी करून लोकांना सावधानतेचा इशारा दिला. तसेच या ठिकाणी तात्वकाळ वन विभागाने पिंजरा (Cage) लावला आहे. परिसरातील नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव (range forest officer manish jadhav) यांनी केले आहे.