दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला; दोघे गंभीर

दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला; दोघे गंभीर

करंजी खुर्द | Karanji Khurd

निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) तामसवाडी (Tamaswadi) येथे रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीस्वारांवर झडप घातली. या घटनेत दुचाकी घसरल्यामुळे दोघेही दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. दोघांवर सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे....

अधिक माहिती अशी की, तामसवाडी येथील पुंडलिक कांदे यांच्या वस्ती जवळ बिबट्या दबा धरुन बसला होता. दुचाकीवरून वंडागळीकडे जात असताना विकास गिते (वय 29)आणि रोहित भोई (वय 23) या दोन तरुणावर हल्ला करुन बिबट्याने त्यांना जखमी केले. यानंतर त्यांना दोघांना सिन्नर येथील ग्रामीण गुर्नाल्यात दाखल करण्यात आले.

तामसवाडी वडांगळीला मोटारसायकल वरती विकास आणि रोहित जात असतानी पुंडलिक कांदे यांच्या वस्तीवळ रात्री आठ वाजेच्या सुमारास दबा धरुन बसलेल्या बिबट्याने यांच्यावर जोरदार झेप घेऊन हल्ला केला.

त्यात दोघांच्या पायाला बिबट्याचा पंजा लागलेल्याने ते जखमी होऊन खाली पडले आरडाओरड करताच तेथील शेतकऱ्यांनी धाव घेऊन बिबट्याला पळवाटुन लावले जखमी झालेल्या विकास, रोहित यास निफाड येथील शासकिय रुग्नालयात दाखल करण्यात आले.

तामसवाडी करंजी तारुखेडले या गावांमध्ये बिबट्याचे प्रमाण वाढले असुन रात्रीच्या वेळी बाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. वनविभागाने याठिकाणी पिंजरे लावून या गावामधील बिबट्याचे जेरबंद करावे त्यात होत असलेले लोडशेडिंगमुळे शेतकरी वर्गाचे बाहेर निघणे अवघड झाले आहे.

- दत्ता आरोटे (जिल्हाप्रमुख प्रहार विद्यार्थी संघटना नाशिक/सदस्य ग्रामपंचायत तामसवाडी)

Related Stories

No stories found.