दोन अपघातात बिबट्या आणि कोल्ह्याने गमावला जीव

दोन अपघातात बिबट्या आणि कोल्ह्याने गमावला जीव

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात मादी बिबट्या आणि कोल्ह्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्यामुळे वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा पुन्हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे....

नाशिक जिल्हयात बिबट्याचा संचार अनेक भागात दिसून येतो. आज पहाटेच्या सुमारास लहवित गाव शिवारात दक्षिण एअर फोर्स गेट परिसरात रेल्वे पटरी पोल नं, 174, 27, 29 दरम्यान रेल्वेच्या धडकेत मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबतची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

तर दुसऱ्या अपघातात. काल (दि १४) रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिक त्रंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी नियतक्षेत्रात हॉटेल राधाकृष्ण रिसॉर्टच्या समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक कोल्हा मादी जखमी झाली होती. अंदाजे तीन वर्षे वय असलेल्या या कोल्ह्याला उपचारासाठी नाशिक येथे आणण्यात आले होते. दरम्यान, रात्री साडेदहाच्या सुमारास या मादीचा मृत्यू झाला.

दोन अपघाताच्या घटनेत दोन्ही वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com