रानभाज्या म्हणजे आदिवासींचा आर्थिक आधार

यंदा करोनाचे सावट
रानभाज्या म्हणजे आदिवासींचा आर्थिक आधार
रान भाजी

नाशिक | Nashik

पावसाळा सुरू झाल्यापासून रानात अनेक रानभाज्या फुलत आहेत. परंतु यंदा करोनाचे सावट असल्याने रानभाज्या बाजारातून गायब झाल्या आहेत.

पावसाळा सुरू झाला की ग्रामीण भागात, निसर्गाच्या सानिध्यात अनेक रानभाज्या फुलू लागतात. टाकळा, शेवरी, भागरी, रानपुदाना, भुईफोट, भारगी, करटोली अशी एक नाही तर अनेक विविधांगी कंद, फूल आढळून येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यात वेगवेगळे पोषक घटक सामावलेले असतात शिवाय औषधी गुणधर्माने परिपूर्ण आणि आरोग्य दृष्टीने अत्यंत उपयुक्त असतात. गेल्या काही वर्षांपासून याची माहिती देखील शहरातील नागरिकांपर्यंत पोहचलेली दिसून येते.

ग्रामीण आणि विशेषता डोंगर, दुर्गम भागात या भाज्यांचे प्रमाण प्रचंड असले तरी त्या आजही दुर्लक्षित आहेत, सध्या लॉक डाऊन मध्ये बाजारात कमी प्रमाणात दिसून येतात. नुकत्याच काही सामाजिक संस्था, ग्राम विकास मंडळानी पुढाकार घेवून या रानभाज्यांच्या गुणवत्तेचा, पोषक घटकांचा, आरोग्य उपयुक्ततेचा प्रचार, प्रसार, व्हावा म्हणून रानभाज्या महोत्सव ही घडवून आणला. परंतु ग्रामीण भागातून शहरी भागात जाण्यासाठी वाहतूक साधन बंद असल्याने या रानभाज्या गावपूरत्याच मर्यादित राहिल्या आहेत.

खेड्यात राहणारा, डोंगराळ, दुर्गम भागात वास्तव करणारा शेतकरी, आदिवासी बांधव याला त्यामुळे पावसाळी शेती समवेत रानभाज्यातून उत्पादनाचे साधन असते. परंतु यंदा करोनाचे सावट असल्याने आदिवासी बांधवाना आर्थिक आधार देणारा हंगामी व्यवसाय यंदा ठप्प झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com