विधान परिषद निवडणूक: मतमोजणी केंद्राची विभागीय आयुक्त गमे यांच्याकडून पाहणी

विधान परिषद निवडणूक: मतमोजणी केंद्राची विभागीय आयुक्त गमे यांच्याकडून पाहणी

नाशिक। प्रतिनिधी | Nashik

जिल्हा निवडणूक (election) शाखेच्या स्वमालकीचे असलेल्या सय्यद प्रिंप्री (sayyad pimpri) येथील गोदामात नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या (Nashik Graduate Constituency) निवडणुकीची दि. 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Dr. Radhakrishna Game) यांनी सय्यद प्रिंप्री येथील मतमोजणी केंद्राची पाहणी करुन आवश्यक त्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी निवडणूक निरीक्षक निपुण विनायक, जिल्हाधिकारी नाशिक तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गंगाथरण्.डी. (Gangatharan.D), जिल्हाधिकारी अहमदनगर तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,

जिल्हाधिकारी धुळे तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा, जिल्हाधिकारी जळगाव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमन मित्तल, जिल्हाधिकारी नंदूरबार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री, उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे, उपायुक्त उन्मेष महाजन, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्वाती थविल, प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावर्षी प्रथमच जिल्हा निवडणूक शाखेच्या सय्यद प्रिंप्री येथील नुतन गोदामात मतमोजणी होणार आहे. या गोदामात दोन मोठे हॉल, इव्हीएम स्ट्रॉंग रूम, निवडणूक निरीक्षक केबिनसह कर्मचाऱ्यांसाठी प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com