मुख्यालयी नसलेल्यांवर कारवाई करा

राष्ट्रीय कॉग्रेसचे शहराध्यक्ष सागर जगताप यांची मागणी
मुख्यालयी नसलेल्यांवर कारवाई करा

पुनदखोरे । वार्ताहर Kalwan

कळवण विभागातील (Kalwan section) महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे (Maharashtra State Electricity Distribution Company) जे अधिकारी मुख्यालयी राहत नाही, त्यांच्यावर कायदेशिर कारवाई (Legal action) करून त्यांची वरीष्ठांनी गोपनिय चौकशी (Confidential Inquiry) करण्याची मागणी राष्ट्रीय कॉग्रेसचे शहराध्यक्ष सागर जगताप (National Congress city president Sagar Jagtap) यांनी केली आहे.

शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना (Semi-government officials and employees) मुख्यालयी राहण्याचे आदेश (Order to stay at headquarters) असतांना कळवण (Kalwan) विभागातील महावितरणचे (MSEDCL) अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंता (Junior engineer) हे मुख्यालयी राहत नाही. शासनाच्या आदेशाला केराची टोपली यांच्याकडून दाखविली जात आहे.

महावितरणचे अधिकारी व कर्मचारींना शासनाने लागु केलेला घरभाडे भत्ता (Rent allowance) ते मुख्यालयी न राहता घेत असल्याने त्यांच्याकडून शासनाची सुद्धा आर्थिक फसवणुक (Financial fraud) होत असल्याने संबधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

कळवण विभाग व शहरातंर्गत 1 कार्यकारी उपअंभियंता, कळवण शहर अर्बनला 1, आर - 2 विभागासाठी 1, देसराणे, दळवट, अभोणा, मानुर, निवाणे आदी ठिकाणी कनिष्ट अभियंताचे विभाग आहे. प्रत्येक अभियंत्यांच्या ताब्यात मोठे परिसर आहे. त्यातील काही महाभागांनी स्थानिक घरमालकांचे खोटे प्रमाणपत्र तयार करुन शासनास सादर केले असल्याचे समजले आहे.

शासनाची या महाभांगाकडून आर्थिक फसवणुक होत असुन मोठयाप्रमाणात यांच्याकडून भाडे आकारणी होत असल्यामुळे ‘आंधळ दळतयं आणि कुत्र पिठ खातंय’ अशी अवस्था झाली आहे. कळवण महावितरण विभागात (MSEDCL Department) नव्याने रुजू झालेले कार्यकारी अभियंता यांचा संबधितांवर वचक नसल्याने त्यांची मनमानी वाढतच आहे. वरीष्ठ स्तरावरुन शासनाची फसवणुक करणार्‍या या महाभांगाची गोपनिय चौकशी करण्याची मागणी यावेळी कॉग्रेस शहराध्यक्ष सागर जगताप यांनी केली आहे.

कळवण महावितरण विभागात अधिकारी व कर्मचारींसाठी निवासस्थान आहे. मुख्यालयी न राहण्याची कोणतेच अधिकारी तजवीज घेत नाही. त्यामुळे यांची मुजोरी वाढतच आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षी भेंडी येथील पारेषण मधुन पिंपळे येथे सबस्टेशनसाठी 33 के. व्ही. लाईनच्या कामांमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होऊन सर्व कामे अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाली होती. याबाबत वेळोवेळी वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा करून सुद्धा संबधित ठेकेदाराला पाठीशी घातल्याचे काम यावेळी करण्यात आले होते. संबधित ठेकेदाराची साधी चौकशी महावितरणने केली नाही. यात काही तरी गौडबंगाळ आहे. याबाबत राज्याचे उर्जामंत्री नितिन राऊत यांची शहर कॉग्रेस कमिटीमार्फत शिष्टमंडळ भेट घेणार आहे.

- सागर जगताप, काँग्रेस शहराध्यक्ष

Related Stories

No stories found.