विळवंडी शाळा
विळवंडी शाळा
नाशिक

दिंडोरी : विळवंडी शाळेला एलईडी टीव्हीसंच भेट

डोनेट टू डिव्हाईस उपक्रमांतर्गत...

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विळवंडी (ता. दिंडोरी) येथे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गुरुनानक मिशन व गुरुमितसिंग रेखी यांच्या माध्यमातून राजेंद्र आढाव, दीपक सोरजे, सतीश निकुंभ, रमेश पटेल यांच्या तर्फे शाळेस एक स्मार्ट एलईडी व सेटअप बॉक्स भेट देण्यात आले.

सध्या सगळीकडे करोनाची साथ असल्यामुळे शाळा बंद आहेत आणि शिक्षण मात्र चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये दिंडोरी तालुक्यातील विळवंडी सारख्या दुर्गम भागांमध्ये ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी स्मार्टफोन, टीव्ही व वेगवेगळ्या उपकरणाची कमतरता असल्यामुळे तेथील उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर कोकणे यांनी 'डोनेट टू डिवाइस' या उपक्रमासाठी मदत करण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना आवाहन केले होते.

त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन भारताचा स्वातंत्र्य दिवस व निवृत्त अभियंते राजेंद्र आढाव यांचा वाढदिवस या दोन्ही कार्यक्रमाचे औचित्य साधून राजेंद्र आढाव, दीपक सोरजे, सतीश निकुंभ आणि रमेश पटेल यांनी शाळेत स्मार्ट एलईडी टीव्ही सेटअप बॉक्स दिली. भविष्यात सुद्धा अशीच मदत करण्याचे आश्वासन सुद्धा दिले.

हे कार्य करण्याची प्रेरणा गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, शिक्षणविस्तार अधिकारी वंदना चव्हाण व केंद्रप्रमुख मीरा खोसे यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com