सिन्नर । Sinnar

तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच होणार असून सरपंच पदाचे आरक्षण ठरवण्यासाठी येत्या सोमवारी (दि.14) सकाळी 10 वाजता आरक्षण सोडत होणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली.

तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींपैकी आरक्षित सरपंचपदाची संख्या शासकीय पातळीवर निश्चित करण्यात आली आहे.

सात ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी तर 14 ग्रामपंचायतींचे सरपंच पद अनुसूचित जमातींसाठी आरक्षित करण्यात आले आहे.

नागरिकांच्या मागास प्रवर्गा?साठी ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित असेल तर 63 ग्रामपंचायतींचे सरपंचपद सर्वसाधारण गटासाठी राखीव राहणार असल्याचे उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी कळवले आहे.

या सर्व आरक्षणाची सोडत सोमवारी तहसील कार्यालयात होणार असून तालुक्यातील नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन कोताडे यांनी केले आहे.