नाशिक । प्रतिनिधी Nashik

गेली आठ महिन्यापासून आरोग्य यंत्रणेने युद्धपातळीवर प्रयत्न केले. तसेच सर्व विभाग व नागरिकांंच्या समन्वयामुळे करोना नियंत्रणात आणण्यात आपणास यश आले आहे.

मात्र दसरा, दिवाळी या सणाच्या काळात नागरिकांंनी करोनाचे नियमांकडे साफ दुर्लक्ष केले याचा परिणाम आता दिसून येत आहे. संभाव्य दुसरी लाट इतर देशांमध्ये आली आहे. शासकीय यंत्रणा पुन्हा सज्ज आहेत. मात्र नागरिकांंनीही स्वत पुन्हा सर्व करोनाचे नियम पाळण्यास सुरूवात करावी, कोवीड सोबत जगणे शिकण्याची आता गरज आहे.

डॉ . रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक