ग्राहक संरक्षण कायदा जाणून घ्या : काळोखे

ग्राहक संरक्षण कायदा जाणून घ्या : काळोखे

सातपूर । प्रतिनिधी Satpur

ग्राहक संरक्षण कायदा Consumer Protection Act , 2019 मधील सविस्तर तरतुदी नागरीकांनी जाणून घ्याव्यात कारण कायदा अधिक प्रभावी झाला असून, यात दंड व शिक्षेची तरतूद चांगल्याप्रकारे करण्यात आली असल्याचे प्रतिपादन ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या Consumer Grievance Redressal Commission सदस्या प्रेरणा काळोखे Prerna Kalokhe यांनी केले.

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक जिल्हा आणि महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने करोना कालावधीत समाजजागृतीसाठी विविध कार्यक्रम आणि समाजकार्य करणार्यांचा सन्मान करण्यात आला. प्रेरणा काळोखे बोलत होत्या यावेळी व्यासपिठावर जिल्हा पुरवठा अधिकारी तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सचिव डॉ. अरविंद नरसीकर, सीए सी.जे.गुजराथी उपस्थित होते.

घोडेगाव येथील संजीवनी हार्टकेअर सेंटर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी ग्राहक पंचायत महानगरचे अ‍ॅड. समीर शिंदे यांनी करोनाकाळात तसेच सैन्यातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली, महानगर संघटक दीपक गोखले यांनी ’ग्राहक गीत’ सादर केले. जिल्हा ग्राहकपाल डॉ. संजय पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा गौरव केला. प्रमुख अतिथींसह जिल्हाध्यक्ष सुधीर काटकर, जिल्हा संघटक दत्ता शेळके, जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर व्यवहारे यांनी चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केले.गुजराथी यांनी ही ग्राहक चळवळ सर्वसामान्य जणांजवळ पोहचली पाहिजे, असे आवाहन केले.

डॉ. नरसीकर यांनी यावेळीग्राहकांसाठी नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली, पण ग्राहक संरक्षण परिषद नेमणुका करोनामुळे अद्याप रखडल्या आहेत. करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून उपक्रम घेण्याचे आवाहन केले.

करोनाकाळात ऑनलाइन व्याख्यानाबद्दल समर्थ बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पुरंदरे यांचा सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधी, ग्राहक सेवा मार्गदर्शन केंद्रप्रमुख रामदास सोनवणे, विश्वनाथ शिरोळे, सुनील पहाडिया, गोपाळराव शिंदे, विनोदकुमार सिंघवी, डॉ. राजेंद्र बागूल, वसंत दंडवते, पवार, डॉ. सीमा डेलें, नरेंद्र पेंडोळे, अमर सोनवणे, डॉ. भूषण शिनकर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संदीप नगरकर यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव सुरेश धारणकर यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com