नाशिक । संतोष शिंदे ,शिंदे वेल्थ मॅनेजमेंटचं सर्व्हीसेस

एसआयपीचे कार्य नेमके कसे चालते ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे -

एसआयपी म्हणजे काय?

- नियमित कालावधीनंतर (सामान्यतः दर महिन्याला) ठराविक रक्कम म्युच्युअल फंडांत गुंतवण्यासाठी राबवण्यात येणारी प्रक्रिया म्हणजे एसआयपी होय. आधी ठरवल्यानुसार, एसआयपी पद्धतीने गुंतवणूकदार युनिट्स विकत घेतात. एसआयपीमुळे सामान्य गुंतवणूकदारांना भांडवल बाजारात उतरण्याची संधी मिळते, बाजारात उतरण्याची वेळ साधता येते तसेच त्यांच्या गुंतवणुकीला शिस्त लावण्याचीही संधी मिळते.

एसआयपी केव्हा सुरू करू शकतो?

- खुल्या म्युच्युअल फंडासाठी केव्हाही एसआयपी सुरू करता येते. एसआयपीसाठी वित्तसल्लागाराकङे जाऊन केवायसी कागदपत्र व एक एसआयपीला चेक प्रमाणे एका किंवा अनेक अर्जावर सही करुन द्यावी लागते.एसआयपीचा अर्ज भरल्यापासून एसआयपी सुरू होईपर्यंत 30 दिवसांचा कालावधी जातो. या काळात बँक तुमची एसआयपी रजिस्टर करते व दरमहा सुरू करते.

किती काळासाठी एसआयपी ठेवता येते?

- अनेक म्युच्युअल फंडांतून किमान 12 महिने एसआयपी सुरू ठेवावी लागते. गुंतवणूकदारांना एसआयपीसाठी कालावधी निवडण्याची मुभा असते. याखेरीज गुंतवणूकदाराला, त्याने म्युच्युअल फंडाला पुढील सूचना देईपर्यंत एसआयपी सुरू ठेवण्याचाही पर्याय असतो. प्रत्येक एसआयपी गुंतवणुकीच्या उद्दिष्टाला जोडून घ्यावी, असा सल्ला वित्त नियोजक गुंतवणूकदारांना नेहमी देतात, जेणेकरून ते उद्दिष्ट साध्य होईपर्यंत ती एसआयपी सुरू ठेवता येईल.

एसआयपीची रक्कम बदलता येते का?

- गुंतवणूकदाराला त्याच्या एसआयपीची रक्कम कमी करता येते किंवा वाढवता येते. मात्र यासाठी पहिली एसआयपी रद्द करून नवी एसआयपी सुरू करावी लागते. यासाठी म्युच्युअल फंडाकडून कोणताही दंड आकारला जात नाही.

एसआयपी सुरू असलेल्या फंडात आपण एकगठ्ठा रक्कम गुंतवू शकतो का?

- होय. एसआयपी सुरू असलेल्या योजनेत तुम्ही एकगठ्ठा रक्कम गुंतवू शकता. त्यामुळे एसआयपीत कोणत्याही प्रकारे बाधा येत नाही. ती विनाअडथळा सुरू राहते.

एसआयपी करताना कमीत कमी किती वर्षासाठी करावी?

-आपली भांडवल वृद्धी चांगली व्हावी, यासाठी कमीत कमी 10 ते 15वर्ष एसआयपी करणे आवश्यक आहे. त्यापुढे जेवढी वर्ष तुम्ही वाढवू शकाल तेवढा चक्रवाढीचा फायदा जास्त मिळतो. आपल्या एसआयपीला एखादें आर्थिक उद्दिष्ट लिंक केल्यास उदा.मुलांचे/मुलींचे शिक्षण, लग्न, घर खरेदी, निवृत्ती इ. किती वर्ष एसआयपी करायची हे वित्त सल्लागार सांगतात.

एसआयपी करताना वित्त सल्लागार कडूनच करावी का बँकेतून केली तरी चालते?

- कुठलीही गुंतवणूक मग तो विमा असो व म्युच्युअल फंङ असो बँकेतून करणे टाळले पाहिजे कारण बँकेतून विक्री नंतरच्या सेवा मिळत नाहीत, पण ब्रोकरेज मात्र तितकेच जाते म्हणून एसआयपी किंवा एकरकमी गुंतवणूक ही वित्त सल्लागाराकडूनच केली पाहिजे त्यावर त्याच वैयक्तिक लक्ष रहात पण वित्त सल्लागाराची निवङ मात्र थोडी काळजीपूर्वक करणे आवश्यक असून त्याला किमान दहा वर्षाचा अनुभव असला पाहिजे कारण एवढ्या वर्षात शेअरबाजाराच्या सर्व चढउताराचे अनुभव त्याला आलेले असल्यामुळे तो काळजीपूर्वक काम करत असतो.

एसआयपी सुरु केल्यावर त्याला सतत ट्रॅक करणे गरजेच असते का?

- नाही, कारण एसआयपी जर इक्विटी फंंडात असेल तर एवरेज कॉस्ट व पावर ऑफ कंपांऊडींग परिणाम दिसायला कमीत कमी 10 वर्षे लागतात. एसआयपी सुरु करणे म्हणजे एक बीज रोवण्यासारखे आहे. रोज रोज बघून त्याची वाढ कमी किंवा जास्त होणार नसते. ते एसआयपीच झाड नैसर्गिकपणे वाढण्यास तेवढा कालावधी देणे क्रमप्राप्त असत.

एसआयपी करताना किती परतावा गृहीत धरावा?

- नेमका किती परतावा मिळेल हे सांगण थोङे अवघङ असले तरी नियोजन करताना वित्तसल्लागार 15% परतावा गृहीत धरुन चालतात.त्यानुसार तुमची एसआयपी पुढील 10/15/20 वर्षात किती रक्कम प्राप्त करु शकेल याचा किमान अंदाज बांधता येतो.

एसआयपी करताना त्यातून बाहेर कधी पडावे?

- एसआयपी ज्या उद्दिष्टासाठी केली आहे ते पूर्ण झाले की त्यातून बाहेर पङावे. समजा तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी 10 वर्षानंतर 25 लाख रु. हवे आहेत. पण 9 व्याच वर्षी बाजार मूल्य वाढून 25 लाख रु मिळत असतील तर तुमचा वित्त सल्लागार तुमची एसआयपी बंद करुन ते सर्व पैसे ङेट फंङमध्ये ट्रान्सफर करून देतो. मग यानंतर तुम्हाला बाजाराच्या चढउताराचा सामना करण्याची गरज रहात नाही.

मी याआधी एका बँकेतून एसआयपी सुरू केली होती, पहिला चेक पण वटला मात्र त्यानंतर माझ्या बॅकेतून दरमहा कपात सुरु झाली नाही आणि बँकेतूनही काही सूचना मिळाली नाही मग आता मी काय करायला हवे?

- या आधी म्हटल्याप्रमाणे बँकेतुन विक्री पश्चात सेवा मिळत नाहीत. आपला पहिला चेक पास होऊन युनिट्स मिळाले असतील पण दरमहा अॅटो ङेबिट सुरु झाले नाहीत, याचा अर्थ त्या एसआयपीला बँकेतून परवानगी नाकारण्यात आली असावी सही चुकल्यास असे होणे साहजिकच आहे. एखाद्या वित्तीय सल्लागाराकङे जाऊन तीच एसआयपी परत सुरु करता येईल.

एसआयपी सुरू केल्यावर शेअरबाजार खाली येऊन बाजारमूल्य कमी झाल्यास काय कराव?

- शेअरबाजार खाली आल्यास एसआयपी व्यतिरिक्त काही एकरकमी गुंतवणूक करावी यामूळे कॉस्ट लवकर एवरेज होऊन जास्त लाभ मिळतो व एसआयपीच आर्थिक उद्दिष्ट वेळेआधीच पुर्ण व्हायला मदत होते.