शिवनई पाझर तलावाला गळती

ग्रामस्थांचा उपोषण इशारा
शिवनई पाझर तलावाला गळती

आंबेदिंडोरी । खंडेराव बोराडे Aambe Dindori

सहा महिन्यांपुर्वी झालेल्या पाझर तलावाचे काम निकृष्ट पध्दतीने झाल्याने त्याला गळती सुरु झाली आहे. संबंधित कामाचे चौकशी होवून दोषींवर कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा शिवनईचे ( Shivnai )सरपंच चंद्रकांत निंबाळकर यांच्यासह सदस्य व ग्रामस्थांनी निवेद्नाद्वारे दिला आहे.

दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथील पाझर तलावाचे काम 1972 ते 1973 साली करण्यात आले होते. या पाझर तलावाचे काम झाल्यानंतर तब्बल 50 वर्षांनी पाझर तलावाला गळती लागली होती. त्या गळतीच्या दुरुस्तीचे काम गेल्या सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. असे असतांना आज मितीस त्या तलावाला पुन्हा गळती लागली आहे.

.

परंतु पाझर तलावाच्या संचीत जलसाठ्यातून पुर्वी पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात जलाशयाची गळती आज मितीस होतांना दिसत आहे. पूर्वी नव्याने तयार झालेल्या पाझर तलावाला जलाशयाच्या आतील बाजूने अतिशय सुंदर शास्त्रोक्त पद्धतीने दगडाची पिचिंग केलेली होती. परंतु दुरुस्तीनंतर जलाशयाची संरक्षण भिंत निकृष्ट दर्जाची झालेली दिसून येत आहे. जलाशयाच्या आतील साठवण क्षमते पासून वरील बाजूस दिड ते दोन मीटर उंच भरावाला कुठल्याही प्रकारे दगडाची पिचिंग करण्यात आलेली नाही. सन 1972 ते 1973 साली पाझर तलावाचे काम झाले होते. तेव्हा पासून आजतागायत पाझर तलाव बर्‍याच वेळा पूर्ण क्षमतेने भरलेला असायचा.

पूर्ण भरल्यानंतर सांडव्याद्वारे अतीरिक्त जलाशयाचा विसर्ग होत असे. परिणामी दुरुस्तीनंतर काम करणार्‍या ठेकेदाराने स्थानिक परिस्थितीची पाहणी करुन पाझर तलाव फुटण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन स्वतः ची चूक लपविण्याच्या उद्देशाने तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडव्याला दोन ते तीन फूट खोल चरी उकरुन जलाशयाचा विसर्ग वाढला. परंतू परिणामी पुर्वी पेक्षा साठवण क्षमता कमी केली. या पाझर तलावाचे दुरुस्तीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने पाझर तलाव फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तलावाच्या भराव्यावर दुरुस्ती आगोदर मोठ मोठे वृक्ष होते. सदर वृक्षांची बेहिशोबी कत्तल करण्यात आली. याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार आहे.

तसेच पूर्वीपासून तलावाच्या भराव्या लगत खालच्या बाजूला साधारणता वीस-पंचवीस लोकांची नागरी वस्ती आहे. तरी पुढील भविष्य काळात जीवीत हानी व वित्त हानी कधी होईल हे सांगता येत नाही. सदर दुरुस्तीचे काम करते वेळी कामाची ग्रामसभेवर ग्रामस्थांमध्ये चर्चा होवून संबंधित विभागाने मंजुरीसाठी पुढील कार्यवाही करणे गरजेचे होते. त्यांनतर निविदा काढून कामाच्या आर्थिक निधी अंदाजपत्रकाची व कृती आराखड्याची माहिती ग्रामस्थांना संबंधित विभागाने देणे बंधनकारक होते.

पाझर तलावाचे काम करण्यासाठी ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारे संबंधित विभागाने विचारात न घेता कुठल्या विभागाने काम केले हेच गणिती कोड ग्रामस्थांना आजतागायत सुटता सुटेना तरी या सर्व बाबींची अडीअडचणींना संबंधित विभागाने ग्रामस्थांना योग्य तो न्याय द्यावा, याबाबतचे निवेदन दिंडोरी पंचायत समिती महसूल विभाग, लघु पाटबंधारे विभाग नाशिक, जि. प. सामान्य प्रशासन विभाग नाशिक यांना दिले आहे. अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा सरपंच चंद्रकांत निंबाळकर यांच्यासह सदस्य रत्नाकर पगारे, सदस्या छाया गटकळ, उषा गटकळ, गंगाधर घुमरे, बाजीराव गडकरी, संपत गटकळ, तुळशीराम गटकळ, कारभारी गटकळ, तुळशीराम गडकरी, दत्तात्रय गटकळ, अंकुश गटकळ यांनी दिला आहे.

सदर पाझर तलावाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. तलावाला बाहेरील बाजूने पुर्वी पेक्षा जास्त गळतीचे प्रमाण वाढल्याने संबंधित विभागाने काम तरी कोणते केले हाच प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत आहे.

चंद्रकांत निंबाळकर, सरपंच शिवनई

पाझर तलावाचे काम कोणत्या विभागाने केले सदर तलावाला किती लाखांची तरतुद होती. आतील बाजूने दगडाची पिचिंग जलसाठ्या पासून वरील बाजूने दोन ते तीन मीटर पिचिंग केलेली दिसून येत नाही.

तुळशीराम गटकळ, सामाजिक कार्यकर्ते

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com