अनेक गावांची तहान भागवणाऱ्या जलवाहिनीस गळती

अनेक गावांची तहान भागवणाऱ्या जलवाहिनीस गळती

वणी । वार्ताहर | Vani

वणी (Vani) येथील बसस्थानक परिसरात असलेल्या 40 गाव पाणीपुरवठा (Water supply) जलवाहिनीतून (aqueduct) गळती होत असून, तीन दिवसांपासून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. संबंधित विभागाला कळवूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.

चांदवड तालुक्यातील (chandwad taluka) 40 गावांना पाणीपुरवठा (Water supply) करणारी जलवाहिनी वणी- पिंपळगाव रस्त्याजवळून गेली आहे. सात डिसेंबरपासून या जलवाहिनीतून पाणी गळती सुरू आहे. याबाबत वणी येथील ज्येष्ठ नागरिक आबासाहेब देशमुख, रवीकुमार सोनवणे व ग्रामपंचायत सदस्य विजू बर्डे आजूबाजूची टपरी व गाळेधारक यांनी संबंधित विभागाला कळविले आहे. दि. 9 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत याची दखल घेण्यात आली नाही.

गळतीमुळे परिसरात चिखल, तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. या जलवाहिनीतून 24 तास पाणीपुरवठा (Water supply) सुरू असतो. अशा प्रकारच्या गळतीमुळे पाणी (watter) व वीजही वाया जाते. संबंधित पाणीपुरवठा विभागाने (Water Supply Department) तातडीने दखल घेऊन जलवाहिनी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com