उस्मानाबादमधील खून, दरोडा टोळीचा म्होरक्या नाशकात जेरबंद

उस्मानाबादमधील खून, दरोडा टोळीचा म्होरक्या नाशकात जेरबंद

जुने नाशिक | प्रतिनिधी | Old Nashik

उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad District) कळंब (Kalamb) येथील खुनासह दरोडा टाकणाऱ्या टोळीतील मुख्य सुत्रधार आरोपीस मुंबई नाका पोलीस ठाणेच्या पथकाने (Mumbai Naka Police Station) नाशिकमध्ये (Nashik) अटक करून उस्मानाबाद पोलिसांच्या (Osmanabad Police) ताब्यात दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ (Vijay Dhamal) यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली...

संशयीत आरोपी सुनिल नाना काळे (Sunil Nana Kale) (२७ , धंदा मजुरी, रा. मुंबई नाका सर्कल, मुंबई-आग्रा हायवे उड्डाणपुलाखाली, नाशिक, कायमचा पत्ता- रा, तेर, कल्पनानगर, पारधी पेढी, ता. कळम, जि. उस्मानाबाद) याच्याविरोधात उस्मानाबाद येथील कळम पोलीस ठाण्यात खुनासह दरोडा टाकल्याप्रकरणी ३०२,३९६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल आहे.

वॉचमनचा खून करून दरोडा टाकणारे आरोपी हे तेथुन पळून गेले होते. म्हणून कळम पोलीस ठाण्याचे पथक मुंबई नाका पोलीस ठाण्यात आले होते.

शहरात विविध ठिकाणी सिग्नल व चौकात गजरे विकणारे बरचशे स्त्री-पुरुष हे ता. कळम, जि. उस्मानाबाद येथील रहिवासी असल्याची माहिती पथकाला मिळाली.

या माहितीच्या आधारे व आरोपीने केलेल्या गंभीर गुन्ह्याची दखल घेत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी गुन्हे शोध पथकास आरोपीचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या.

पो. शि. पानवळ व आव्हाड यांना संशयित मुंबई नाका सर्कलवर गजरा विकणाऱ्या महिला व पुरुष यांच्यातील एक आहे, असे समजल्याने त्यांनी आरोपीवर पाळत ठेवली.

आरोपीच्या वर्णनासारखा व्यक्ती फिरत असल्याची खात्री झाल्यानंतर सपोनि के. टी. रोंदळे, सोनार, डोंगरे, डंबाळे, पानवळ, आव्हाड, गायकवाड, पवार यांच्या पथकाने किनारा हॉटेलच्या (kinara Hotel) पाठीमागे नंदीनी नदीलगत (Nandini river) परिसरात संशयिताचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.

त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर कळम पोलीस ठाण्याचे पथक मुंबई नाका पोलीस ठाण्यात येऊन आरोपीस ताब्यात घेण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com