
निफाड| रावसाहेब उगले | Raosaheb Ugale
तालुक्यातील ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धान्याची वाहतूक करणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. मात्र, सदर धान्य रेशनचे की शेतकऱ्यांचे याबाबत प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, अन्न पुरवठा विभाग व तहसीलदारांच्या चौकशीनंतरच सत्य बाहेर येणार आहे...
याबाबत माहिती अशी की, गुरुवारी (दि. १६) रात्रीच्या सुमारास मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालत असताना तपासणीदरम्यान दिंडोरी तालुक्यातील उमराणेमार्गे धान्याची वाहतूक करणारा ट्रक (क्र. एमएच ४६ - एफ - ३२३९) ताब्यात घेण्यात आला.
याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात कुठल्याही गुन्ह्याची नोंद नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी दैनिक देशदूतला दिली. तर, वाहतूक केल्या जाणाऱ्या धान्याचे रितसर बिले असल्याचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी सांगत हे धान्य रेशनचे आहे की खासगी विक्रीसाठी चालले आहे याबाबत चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले.