विधी, शिक्षणशास्त्र प्रवेश अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ

विधी, शिक्षणशास्त्र प्रवेश अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) राबविण्यात येणाऱ्या पाच वर्षे विधी (LAW) व चार वर्षांच्या शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या (Pedagogy) प्रवेश परीक्षेचे (Entrance exams) अर्ज भरण्यास मुदतवाढ (Extension of application deadline) देण्यात आली आहे. विधीसाठी विद्यार्थ्यांना २० जुलैपर्यंत तर शिक्षणशास्त्रासाठी १६ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहेत...

सीईटी सेलमार्फत (CET cell) आठ जूनला एमएचटी-सीईटीच्या (MHT-CET) अर्ज प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर सीईटी सेलमार्फत २८ जूनपासून पाच वर्षे विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना १२ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, ही मुदत वाढविण्यात अल्याचे नुकतेच सीईटी सेलमार्फत जाहीर करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १३ जुलै ते २० जुलै यादरम्यान अर्ज करता येणार आहेत.

शिक्षणशास्त्र सीईटीसाठी (Pedagogy CET) २५ जून ते ८ जुलैदरम्यान या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले होते. परंतु, आता विद्यार्थ्यांना बीए (BA), बीएड (B.Ed) व बीएस्सी बीएड (B.Sc. B.Ed.) हे अर्ज १६ जुलैपर्यंत दाखल करता येणार आहेत.

या प्रवेश परीक्षेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. प्रवेश परीक्षेची तारीख, हॉल तिकीट डाउनलोड करण्याची तारीख, परीक्षेचे वेळापत्रक कालांतराने जाहीर केले जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com