कायदा,सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध

जनता संवाद मेळाव्याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक तांबे यांचे प्रतिपादन
कायदा,सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध

निफाड। प्रतिनिधी Niphad

शेतमाल विक्री प्रसंगी होणारी शेतकर्‍यांची फसवणूक (Fraud of farmers) कशी कमी करता येईल यासाठी आपण सर्वांमिळून प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे भरोसा पेक्षा चिकित्सा या शब्दाकडे आपण वळले पाहिजे.

मागील वर्षी शेतकर्‍यांचे (farmer) व्यापार्‍यांनी थकविलेले साडेतीन कोटी रुपये आपण वसूल करू शकलो. शेतकर्‍यांच्या समस्या सोडविणे ही आपली जबाबदारी असून पुढील संवाद मेळाव्यात कौतुकापेक्षा तुमच्या आशिर्वादाची अपेक्षा आहे. तसेच जेथे आम्ही कमी पडलो ती चुक लक्षात आणून द्या. तुम्हाला चांगले व सुरक्षित वातावरण देण्यासाठी मी कटीबद्ध आहे असे प्रतिपादन निफाडचे (niphad) उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे (Subdivisional Police Officer somnath tambe) यांनी केले आहे.

निफाड पोलीस स्टेशनच्या वतीने पं.स. सभागृहात आयोजित संवाद मेळाव्याप्रसंगी तांबे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर नगरसेवक अनिल कुंदे, शिवाजी ढेपले, पोलीस निरीक्षक रंगराव सानप, स.पो.उ.नि. पटारे उपस्थित होते. यावेळी तांबे म्हणाले की, दर सहा आठवड्यातून जनता दरबार घेतला जाईल. कारण हा तुमचा दरबार आहे. आमचा संवाद आहे. द्राक्ष व्यापारी (Grape merchants)फसवणूक बाबत आपल्याकडे पुरावे असले पाहिजे.

आपण देखील बाहेरून आलेल्या माणसावर कसा भरवसा ठेवायचा याचा विचार केला पाहिजे. तसेच शंका ही सुरक्षेची पहिली पायरी आहे. तुमच्या समस्या सोडविण्याला माझे नेहमीच प्राधान्य राहिल. किंबहुना मी तुमच्या सोबत असेल असेही तांबे म्हणाले. यावेळी पोलीस निरीक्षक रंगराव सानप म्हणाले की, पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या गावात पेट्रोलिंग (Patrolling) करून अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन केले.

यावेळी अनिल कुंदे यांनी निफाड शहरात सुरू असलेले अवैध धंदे, जुगार, मटका याचा स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास तर शहरात कॉलेजमधील मुलांना व्याजाने पैसे देणारी टोळी सक्रीय असल्याचा उल्लेख करीत याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तर शिवाजी ढेपले यांनी भूमिअभिलेख मधील भ्रष्ट्राचाराचा पाढा वाचत द्राक्ष व्यापार्‍यांची नोंदणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन करुन रस्त्यावर भरणारा बाजार सुरक्षित स्थळी हलविण्याची मागणी केली.

यावेळी अनिल कुंदे यांनी निफाड शहरात सुरू असलेले अवैध धंदे, जुगार, मटका याचा स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास तर शहरात कॉलेजमधील मुलांना व्याजाने पैसे देणारी टोळी सक्रीय असल्याचा उल्लेख करीत याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तर शिवाजी ढेपले यांनी भूमिअभिलेख मधील भ्रष्ट्राचाराचा पाढा वाचत द्राक्ष व्यापार्‍यांची नोंदणी आवश्यक असल्याचे प्रतिपादन करुन रस्त्यावर भरणारा बाजार सुरक्षित स्थळी हलविण्याची मागणी केली.

या सर्व प्रश्नांना पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी समर्पक उत्तरे दिली. यावेळी संपत व्यवहारे, सुहास सुरळीकर, अ‍ॅड.अशोक निकम, नूर शेख यांनी समस्या मांडल्या. याप्रसंगी नगरसेवक देवदत्त कापसे, तन्वीर राजे, दौलत कापसे, साहेबराव कापसे, भास्कर धारराव, सुधाकर कापसे, उत्तम गाजरे, मधूकर कुंदे, गोरक्षनाथ डांगले, दिलीप कराड, सविता कुंदे, सोपान खताळे, विश्वास शिंदे, मधूकर कोकाटे, विजय खडताळे, सागर निकाळे, शाकीर शेख, आशा निकम, अनिता डांगळे, दिनेश काऊतकर, सचिन खडताळे, सचिन जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांनी उपस्थितांचे आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com