ब्रह्मगिरी फेरीमार्गावर फुलली ‘लावी खरपुडी’
नाशिक

ब्रह्मगिरी फेरीमार्गावर फुलली ‘लावी खरपुडी’

आला आला श्रावण आला....

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

श्रावण महिना सुरू झाला की धरतीला हर्ष होतो आणि तीही आपले हिरवे सौंदर्य मनसोक्त उधळते. झाडांना, वेलींना आणि फुलांना भर येतो.

ब्रह्मगिरी डोंगर चहुअंगांनी नटला आहे. हा डोंगर गिर्यारोहकांबरोबरच वनस्पतींच्या अभ्यासकांनाही खुणावतो. कारण ब्रह्मगिरीवर दोनशेपेक्षा जास्त वनस्पती सापडतात. ज्यातील काही दुर्मिळ आहेत. प्रा. आनंद बोरा यांना या डोंगरावर प्रथमच ‘लावी खरपुडी’ ही दुर्मिळ वनस्पती आढळली आहे.

ही सेरोपेजी वनस्पतीच्या वंशातील मानली जाते. हिची फुले विशिष्ट आकाराची आणि मनमोहक रंगाची आहेत. लावी खरपुडीची वेगवेगळ्या रंगांची फुले सह्याद्रीच्या जंगलात पाहायला मिळतात. कंदिलांप्रमाणे दिसणार्‍या या फुलांच्या भारतात साठहून अधिक जाती असून जुलै ते सप्टेंबर या कालावधीत फुलणार्‍या या फुलांना सध्या बहर आला आहे.

या फुलांना पॅरासोल फ्लॉवर, पॅराशूट फ्लॉवर, बुशमनची पाईप, हृदयेची तार, साप लता, जपमाळ वेल, नेकलेस वेलींसह अशी अनेक नावे आहेत. 1970 मध्ये हरिश्चंद्रगडावर ती सोडल्याची नोंद आहे. त्यांतर पुन्हा ती त्या परिसरात आढळून आली नाही. या वनस्पतीच्या कंदाचा उपयोग भाजीसाठी केला जातो त्यामुळे ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

लावी खरपुडीचा अभ्यास व्हावा!

ही वनस्पती दुर्मिळ गटात मोडते. हिची फुले खूपच सुंदर असतात. ही वनस्पती प्रथमच ब्रह्मगिरी फेरी मार्गावर बहरली आहे. नाशिक मध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती व वनफुले आहेत. त्यांचा अभ्यास पाहिजे तसा झालेला नाही.

- प्रा.आनंद बोरा, वनफुले अभ्यासक

Deshdoot
www.deshdoot.com