लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलावास प्रारंभ

लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलावास प्रारंभ

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

येथील बाजार समितीच्या ( Lasalgaon APMC )भगरीबाबा धान्य व भाजीपाला मुख्य बाजार आवारात टोमॅटो लिलावाच्या ( Tomato Auction ) शुभारंभाला 1,790 क्रेटस्मधून विक्रीला आलेल्या टोमॅटोस कमीत कमी 151 रु., जास्तीत जास्त 601 रु. तर सरासरी 341 रु. प्रतिक्रेटस् भाव मिळाला.

तर लिलावाच्या सुरुवातीला वाहेगाव साळ (ता. चांदवड) येथील शेतकर्‍याच्या टोमॅटोस 601 रु. प्रतिक्रेटस्चा भाव मिळाला असून हा टोमॅटो बागवान फ्रुट कंपनीने खरेदी केला आहे. शेतकर्‍यांनी आपला टोमॅटो माल प्रतवारी करून विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप ( Market Committee Chairperson Suvarna Jagtap )यांनी केले आहे.

बाजार समितीत टोमॅटो लिलावाच्या सुरुवातीस सभापती सुवर्णा जगताप, सचिव नरेंद्र वाढवणे, टोमॅटो व्यापारी शिवाजी जगताप, भगवान सरोदे, बापू धरम यांच्या हस्ते टोमॅटो क्रेटस्चे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी जगताप यांनी आपल्या मनोगतात लासलगाव बाजारपेठ कांद्याबरोबरच टोमॅटो, डाळिंब व भाजीपाल्यासाठीही नावारूपास येत असून टोमॅटो शेतीमालास स्पर्धात्मक बाजारभाव मिळावा म्हणून टोमॅटो खरेदीदार, निर्यातदार व्यापार्‍यांची संख्या वाढवण्यावर बाजार समितीचा भर राहणार असून लिलावानंतर शेतकर्‍यांना तातडीने रोख चुकवती केली जाणार आहे.

तसेच टोमॅटो लिलावात नव्याने सहभागी होऊ इच्छिणार्‍या खरेदीदार, निर्यातदार व्यापार्‍यांनी परवान्यासाठी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी टोमॅटो व्यापारी मच्छिंद्र काळे, फहीम अब्दुल बारी मोमीन, हैदर पठाण, सागर आहेर, संजय साळुंके, तनवीर शेख, सचिन देशमुख, सुधीर मोरे, शरद हिरे, नंदकिशोर व्यास, अशोक नेटारे, दीपक केदारे, बाजार समितीचे सहाय्यक सचिव अशोक गायकवाड, सर्व लिलावप्रमुख सुनील डचके, प्रभारी हिरालाल सोनारे, पंकज होळकर, नामदेव बर्डे, दिगंबर कासव, प्रमोद कुलकर्णी आदींसह बाजार समिती पदाधिकारी, व्यापारी व टोमॅटो उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.