'शोध गांधी नेहरू पर्वाचा' पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचे लोकार्पण

'शोध गांधी नेहरू पर्वाचा' पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचे लोकार्पण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

देशात सध्या विरोधकांची द्वेश आणि नफरत हीच भावना अधिक आहे.त्याची सांगड भाजपने धर्माशी जोडून हिंदु राष्ट्रनिर्मितीचा अजेंडा चालविला आहे. तो देशाच्या एकतेसाठी भविष्यात घातक ठरणार आहे.त्यामुळे या विचारांतून देशात फुट पडू शकते, अशी भीती काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त करत काँग्रेस मुक्त भारताचे स्वप्न बघणारा भारतीय जनता पक्षच ‘काँग्रेस युक्त’ होत चालला आहे.

ज्येष्ठ पत्रकार,लेखक सुरेश भटेवरा यांच्या 'शोध गांधी नेहरू पर्वाचा' या पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचा लोकार्पण सोहळा येथील कालिदास कलामंदिर येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी आमदार उल्हास पवार, पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा,पुन मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर यांच्यासह राजकीय, सामाजिक, पत्रकारिता यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

केतकर म्हणाले, काँग्रेस मुक्त भारताचे स्वप्न बघणारा भाजप ‘काँग्रेस युक्त’ होत चालला असून काँग्रेसचे नेते त्यांना स्वत:च्या पक्षात हवे आहेत.मात्र, पंडीत नेहरुंचे विचार नको असून तो संपविण्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुले खोट्या इतिहासाचा सातत्याने भडिमार केला त्याच्याकडून केला जात आहे.देशात महागाई, द्वेशभावनेचे वातावरण असून लोक मात्र यावर बोलत नाही.या लोकांचा आवाज ‘बुलंद’ व्हावा ,यासाठीच राहुल गांधी यांनी ‘नफरत तोडो, भारत जोडो’ ही 150 दिवसांची पायी यात्रा सुरु केली आहे.

या यात्रेला भाजप विरोधी पक्षांसह सर्वसामान्य जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.मात्र, त्याची प्रसिध्दी होणार नाही, याची पुरेपुर काळजी भाजपने घेतल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्षातील नेत्यांपेक्षा भाजपला नेहरुंच्या विचारांचीच अधिक भीती वाटत आहे. म्हणून हा विचारच संपवण्याचे घाट सुरु आहे. भाजपचे नेते म्हणतात की, काँग्रेस पक्ष संपला आहे. मग त्यांना काँग्रेसची इतकी भिती का वाटत असून काँग्रेसच्या अध्यक्षा बद्दल यांना एवढी चिंता का वाटत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी बोलताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले,महात्मा गांधी, नेहरू यांनी देशाच्या जडणडणीत दिलेलं योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. देशाचा इतिहास हा त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मात्र,देशातील काही लोकांकडून महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे.तो कदापी यशस्वी होऊ शकत नाही.मोतीलाल नेहरू यांच्या जीवनात स्वदेशी आंदोलनाने मोठे परिवर्तन घडवले.संपूर्ण कुटंबच खऱ्या अर्थाने आंदोलक बनले होते.मात्र,आज याच महापुरुषांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. ज्या भारतासाठी हे महापुरुष लढले त्यांची बदनामी केली जात आहे.नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.हे मोठ दुर्दैव आहे.

देशात नेहरूंनी अनेक महत्वाच्या संस्था निर्माण केल्या. भारताच्या आधुनिक जडणघडणीत त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी उभारलेल्या संस्था आणि प्रकल्पांनी या देशाला विकासाची वाट दाखवली. देशात तंत्रज्ञानाचा जो विकास झाला तो राजीव गांधी यांच्यामुळेच झाला आहे. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले असा चिमटा त्यांनी यावेळी काढला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील म्हणाले, विधानसभेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाविषयी सत्ताधारी पक्षाच्या एकाही आमदाराने तोंड उघडले नाही, याचा खेद वाटतो. ‘शोध : नेहरु, गांधी पर्वाचा’ या पुस्तकाचे हिंदी, इंग्रजीसह गुजराती भाषेत अनुवाद करावा,असा टोलाही त्यांनी लगावत ते म्हणाले, इतिहास खोडण्याचा प्रयत्न कुणी कितीही केला तरी इतिहास हा कदापी बदलणार नाही. सन 2014 पासून देशाला स्वातंत्र्य मिळाले, असा इतिहास लिहिण्यासाठी संसदेची इमारत नव्याने बांधली जात असल्याचे ते म्हणाले. याउलट पंडीत नेहरुंनी उभारलेल्या संस्था देशातील फक्त दोनच व्यक्तिंना विकण्याचे काम सध्या सुरु असल्याची टिका त्यांनी भाजपवर केली. काँग्रेसचा मूळ विचारच देशाला वाचवू शकतो. त्यासाठी पक्षातील विचारी लोकांनी जुना इतिहास नवीन लोकांना समजून सांगण्याचे आवाहन त्यांनी केले.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी काँग्रेसचे विचार हे देशाचे अखंडत्व, सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com