मध्यान्ह भोजन उपक्रमाचा शुभारंभ

कामगारांनी तातडीने नोंदणी करावी:भुजबळ
मध्यान्ह भोजन उपक्रमाचा शुभारंभ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सरकारने कामगारांची अडचण लक्षात घेऊन मध्यान्ह भोजन योजना 17 जिल्ह्यात सुरू केली आहे. राज्यात 18 लाख 75 हजार नोंदीत बांधकाम कामगार Constructions workers आहेत. त्यातील 34 हजार 500 कामगार हे नाशिकमध्ये आहेत.

या कामगारांना कामगार कल्याण मंडळाद्वारे Workers Welfare Board सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक बाबतीत कार्यक्रम राबवत मदत केली जात आहे.कामगारांनी तातडीने नोंदणी करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ Guardian Minister Bhujbal यांनी केले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंंडळाच्या माध्यमातून असंघटीत बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक परिसरातील 34हजार 500 कामगारांना दुपारचे व सायंकाळचे भोजन देण्याचे काम इंडो अलाईड या कंपनीला देण्यात आलेले आहे. या कंपनीच्या माध्यमातून अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आली असून या माध्यमातून पॅकबंद डब्यातून 6 तास गरम राहील, अश्या यंत्रणेच्या माध्यमातून अन्न पुरवले जाणार आहे. नाशिक शहर परिसरातील 40 किमी क्षेत्रातील असंघटीत नोंदित व नोंदित नसलेल्या कामगारांना ही सेवा दिली जाणार आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आ.सिमा हिरे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ंठाकरे, शशिकांत जाधव हे होते. पाहुण्याचा सत्कार कामगार उपायुक्त विकास माळी, सहाय्यक कामगार आयुक्त शर्वरी पोटे,सहाय्यक कामगार आयुक्त सुजित शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रास्तविकात विकास माळी यांंनी कामगारांसाठीच्या विविध योजनांची माहीती दिली.बांधकाम सेसच्या माध्यमातून विविध 28 योजना कार्यान्वित केल्या असून,32 कोटींचा आरोग्य, सामाजिक सुविधांच्या माध्यमातून लाभ दिला आहे. मध्यान्न व रात्रीचे भोजन विनामूल्य दिले जाईल.नाशिक विभागाने 27 हजार जणांना 35 कोटी रुपयांचा विविध योजनांतून लाभ दिला असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र शासनाने 1 मे 2011 ला कामगार विभागातर्फे बांधकाम कल्याणकारी मंडळ स्थापन केले होते. सेसच्या माध्यमातून मंडळाकडे 11 हजार कोटी जमा झाले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. या निधींच्या माध्यमातून राज्यात 17 जिल्हात मध्यान्न भोजन योजना राबविली जाणार आहे. राज्य शासनाने कोवीड काळात 9 लाख टन अन्न धान्य 54 हजार रेशन दुकानांच्या माध्यमातून वाटप केले असल्याचे सांगितले.

कामगार मंडळाने अतिशय चांगले काम सुरू केलें आहे.ज्यांना ज्यांना अडचण आहे, त्यांना जेवण मिळणार आहे. कुठेही तक्रार येणार नाही अशा पद्धतीने काम करा, कितीही चांगलं असेल पण एक डाग असेल तर लोकांचे तिथे लक्ष जाते. तसे होईल असें काही करू नका अशाय् सूचनाही भुजबळांनी दिल्या. सूत्रसंचलन शलाका गिते यांनी तर आभार सुजित शिर्के यांनी मानले.

Related Stories

No stories found.