द्राक्षमणी लिलावाचा शुभारंभ

द्राक्षमणी लिलावाचा शुभारंभ

पालखेड मि.। वार्ताहर | Palkhed

पिंपळगाव बाजार समितीच्या (Pimpalgaon Market Committee) पालखेड उपबाजार आवारावर बाजार समिती सभापति आमदार दिलीप बनकर (Market Committee Chairman MLA Dilip Bankar) यांच्या हस्ते द्राक्षमणी लिलावाचा (Grape bead auction) शुभारंभ करण्यात आला. शेतकर्‍यांनीं आणलेल्या द्राक्षमण्यास पहिल्याच दिवशी प्रति 20 किलो क्रेटस्ला कमीत कमी 55 रु., जास्तीत जास्त 450 रु. तर सरासरी 170 रुपये भाव मिळाला आहे.

परिसरात द्राक्षपीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून यावर्षीचा द्राक्षहंगाम (Grape season) सुरू झाला असून द्राक्ष उत्पादकांंचे (Grape growers) द्राक्षमणी विक्रीची गैररसोय होवू नये यासाठी पिंपळगाव बाजार समितीने (Pimpalgaon Market Committee) गेल्या काही वर्षापासून पालखेड उपबाजार आवारावर द्राक्षमणी लिलाव सुरू केले आहे. त्यास शेतकर्‍यांची (farmers) चांंगली पसंतीं मिळत आहे.

योग्य वजन, रोख चुकवती, जास्तीत जास्त दर यामुळे येथे द्राक्षमणी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. शेतकर्‍यांच्या द्राक्षमण्यांना जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी शेतकर्‍यांनी द्राक्षमणी प्रतवारी करून विक्रीस आणावे असे आवाहन बाजार समिती सभापति आमदार दिलीप बनकर (mla dilip bankar), उपसभापति दीपक बोरस्ते, सचिव बी.एस. बाजारे आदींसह संचालक मंडळाने केले आहे.

याप्रसंगी रामभाऊ माळोदे, अश्विनी काळे, दत्तात्रय चव्हाण, भाऊसाहेब मेधने, माधव ढोमसे, बाबासाहेब शिंदे, ग्रामपालिका सरपंच रवींद्र कोकोटे, सोसायटी सभापति दशरथ जगझाप, पालखेड कार्यालयाचे निरीक्षक सदाशिव थेटे आदींसह द्राक्ष व्यापारी निवृत्ती कोकाटे,

दत्तु चौधरी, अजिज शेख, नंदकुमार मंडलिक, रवींद्र चौधरी, बंटी बोथरा, मकसुद सय्यद, परसराम शर्मा, बंटी लोढा, रवि चौधरी, बंटी जाधव, नगरसेवक सागर कुंदे, रमेश शिंदे, सुरेश आगवणे, अजय गवळी, बाबाजी आहेर, चिंधू जाधव, नंदु झाल्टे, केशव शिंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com