कर सल्लागारांच्या राज्यव्यापी परिषदेस प्रारंभ

अ‍ॅ‍ॅड. प्रकाशचंद सुराणा यांचा 'जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मान
कर सल्लागारांच्या राज्यव्यापी परिषदेस प्रारंभ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (North Maharashtra Tax Practitioners Association )यांच्या पुढाकाराने आणि राज्यातील जीएसटीपीएएम मुंबई तसेच नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन नाशिक आणि पुणे येथील महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन या कर कायदा क्षेत्रातील नामांकित संघटना मिळून आज राज्यातील तमाम कर सल्लागार यांचेसाठी सुमारे १२ वर्षानंतर, राज्यव्यापी परिषदेचे आयोजन करून खऱ्या अर्थाने ज्ञानाचा महाकुंभ सर्वांसाठी खुला करून दिला असल्याचे मत केंद्रीय जीएसटी आयुक्त अविनाश थेटे यांनी व्यक्त केले.

उत्तर महाराष्ट्र टॅक्स असोसिएशनच्या पुढाकाराने नाशिक येथे दोन दिवसीय राज्यव्यापी परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून ते व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर राज्यकर आयुक्त सुभाष येंगडे तसेच एस के डी कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक संजय देवरे उपस्थित होते. यावेळी बोलतांना थेटे यांनी सांगितले कि,विविध व्यापारी, उद्योजक, कारखानदार या सारख्या मोठ्या करदात्यांना सुयोग्य मार्गदर्शन करून सरकारला कररूपाने उत्पन्न मिळवून देण्यामध्ये कर सल्लागार हा मध्यस्थ म्हणून मोठी भूमिका पार पाडत असतो. कायद्यांमध्ये होत असलेले बदल नवीन नियम याबाबत सर्वप्रथम

कर सल्लागारांना त्यांचे क्षेत्रातील स्वतःचे ज्ञान अवगत करून घ्यावे लागत असते. यावेळी नाशिक कर सल्लागार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष, त्याचप्रमाणे अंध बांधवांसाठी दृष्टिदानाचे सामाजिक कार्य करणारे नासिक येथील अ‍ॅ‍ॅड. प्रकाशचंद सुराणा यांचा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते "जीवनगौरव पुरस्कार" देऊन सन्मान करण्यात आला.

या परीषदेसाठी अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, परभणी,पुणे,औरंगाबाद, हिंगोली,नांदेड आदी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे २५० करसल्लागार, सीए, त्याचप्रमाणे टॅक्स वकील उपस्थित होते.द्वितीय सत्रामध्ये प्रमुख वक्ते प्रमोद शिंगटे तसेच सीए संजय मुथा यांनी आयकर कायद्यातील "फेसलेस असेसमेंट" या नवीन तरतुदीबाबत विस्तृतपणे माहिती देऊन उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले

याप्रसंगी महाराष्ट्र अध्यक्ष मनोज चितळीकर,जीएसटीपीएएम महाराष्ट्र या संघटनेचे अध्यक्ष आलोक मेहता,नासिक टॅक्स असोसिएशन चे अध्यक्ष एन बी मोरे ,नरेंद्र सोनवणे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चव्हाण, नाशिक कर सल्लागार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅ‍ॅड.श्री प्रकाशचंद सुराणा, एसकेडी कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडचे संजय देवरे ,प्रकाश विसपुते,कॉन्व्हेंअर पंकज पारक, अमोल माने, मीडिया जनसंपर्क योगेश कातकाडे,नितीन डोंगरे,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीए आदित्य क्षत्रिय यांनी केले.

परिषदेच्या प्रथम सत्रात सीए विशाल पोद्दार तसेच मुंबई येथे प्रख्यात अ‍ॅ‍ॅड. दीपक बापट यांनी जीएसटी कायद्यातील नवनवीन तरतुदींबाबत, विस्ताराने माहिती देऊन, या कायद्यात करण्यात आलेले बदल, झालेल्या सुधारणा याबाबत उपस्थित कर सल्लागार यांना सविस्तर माहिती दिली.

Related Stories

No stories found.