
वाजगाव | शुभानंद देवरे Vajgaon / Deola
देवळा तालुक्यात ( Deola Taluka ) शिवसंपर्क अभियानास ( Shivsampark Abhiyan )प्रारंभ झाला असुन या अभियानांतर्गत शिवसेनेच्या कार्यकर्त्यासह नागरिकांच्या भेटी - गाठी होऊन त्यांच्या समस्या व गावपातळीवर करावयाचे नवीन विकासकामे आदी विषयी चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुकांसाठी शिवसेनेनं कंबर कसलीय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मार्चपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली असुन गावो-गावी सर्वत्र शिवसंपर्क अभियानांतर्गत जोरदार सुरू झाली आहे.
देवळा तालुक्यातील शिवसंपर्क अभियानाच्या पहिल्या टप्प्यात आज (दि.२७) रोजी वाजगाव येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवसेनेनं केलेली विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या व गावस्थारील मुख्य समस्या सोडविणे, गावातील नागरिकांच्या मागणीनुसार नवीन विकासकामे घेणे. या मुख्यउद्देशाने व सर्व सामान्य जनतेला भेडसावणा-या समस्या, शासकीय - निमशासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी तालुक्यातील शिवसैनिक लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर सोडवून नागरिकांप्रती शिवसेनेचे अस्तित्व कायमस्वरूपी प्रस्थापित रहावे यासाठी सर्वच शिवसैनिकांनी प्रयत्नशील रहावे.
याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थानांवर भगवा फडकवण्यासाठी सर्वांनीच तयारी करावी अशी माहिती यावेळी सर्व शिवसैनिकांना देण्यात आली.
जिल्हा प्रमुख देवा वाघ, पक्षनिरीक्षक चिरमुले, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष भारतीताई जाधव, ज्योतीताई थोरात, देवळा तालुकाध्यक्ष बापूसाहेब जाधव, जिल्हा संघटक सुनील पवार, शहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ, बाळासाहेब खैरणार, नाजीम तांबोळी, के. डी.शिंदे, युवा सेना ग्रामीण उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर देवरे, गिरीधर आहेर, सुनील देवरे, वाखरी गण प्रमुख ज्ञानेश्वर नलगे, विजय शिंदे, विलास शिंदे, गट प्रमुख गोरख गांगुर्डे, दीपक देवरे, अमोल देवरे, समाधान देवरे, आकाश सोनवणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.