लासलगाव बाजार समितीत डाळिंब लिलावाचा शुभारंभ

400 रुपयांपासून 5200 रु. प्रतिक्रेटस् भावाने डाळिंब खरेदी
लासलगाव बाजार समितीत डाळिंब लिलावाचा शुभारंभ

लासलगाव । वार्ताहर

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारावर डाळिंब लिलावाचा शुभारंभ सभापती सुवर्णा जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी 512 क्रेटस्ची आवक होऊन व्यापारीवर्गाने 400 रुपयांपासून 5200 रु. प्रतिक्रेटस् भावाने डाळिंब खरेदी केले. यावेळी डाळिंबास सरासरी 1800 रु. प्रतिक्रेटस्चा भाव मिळाला.

नाशिक जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने लासलगाव बाजार समितीने गेल्या काही वर्षांपासून डाळिंब लिलाव सुरू केले आहेत. विक्रीनंतर रोख पेमेंट देण्यात येत असल्याने येथे डाळिंबाची आवक वाढत आहे.

डाळिंब लिलाव शुभारंभाच्या मुहूर्तावर शिरसगाव लौकी येथील शेतकरी गोरख बुल्हे यांच्या डाळिंबास 5,200 रु. प्रतिक्रेटस्चा भाव मिळाला असून हे डाळिंब अखलाख हाजी मोहम्मद जाबीर अन्सारी यांनी खरेदी केले आहेत. याप्रसंगी बाजार समिती सदस्य रमेश पालवे, नरेंद्र वाढवणे,पी.आर. कुमावत, ए. डी. गायकवाड, एस. डी. डचके, एच.वाय. सोनारे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com