पोलीस फिव्हर क्लिनीकचा प्रारंभ

कोवीड सेंटर, ग्रीन ज्युसनंतर पोलीस आयुक्तांचे पाऊल
पोलीस फिव्हर क्लिनीकचा प्रारंभ

नाशिक | Nashik

पोलीसांसाठी कोवीड केअर सेंटर यशस्वी केल्यानंतर तसेच ग्रीन ज्युसद्वारे औषधोपचार पद्धती विकसीत करून पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी आता कायमच पोलीसांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी फिव्हर क्लिनीक सुरू केले आहे. याचा प्रारंभ आज झाला

पोलीस मुख्यालयात बरॅक १७ या ठिकाणी सुरू झालेल्या या क्लिनिकचे उदघाटन सोमवारी (दि.३०) सायंकाळी ६ वाजता पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोनाच्या दुसरर्‍या लाटेच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून फिवर क्लिनिकचे सुरु करण्यात आले आहे.

या क्लिनीकमध्ये फ्ल्यू, तापाची लक्षणे असतील त्यांना तत्काळ चाचणी व निदान केले जाणार आहेत. मधुमेह, रक्तदाब रुग्णांवर नेचरोपॅथी, आयुर्वेद व होमीओपॅथीचा समावेश करुन उपचार केले जाणार आहेत. यासह विविध सुविधा उपलब्ध असणार आहेत.

या ठिकाणी पोलीस अधिकार्‍यांपासून ते शिपायापर्यंत व त्यांच्या कुटुंबियांवर उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी पोलीस आयुक्तांनी उपाययोजना करण्याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या स्टाफला मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. फिवर क्लिनिक पोलिसांसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे.

यावेळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, सिताराम गायकवाड, समीर शेख, दीपाली खन्ना, अशोक नखाते, पोलीस अधिकारी सिताराम कोल्हे, अशोक भगत, इरफान शेख, अंचल मुदगल, सूरज बिजली, साजन सोनवणे, विजय ढमाळ, कुमार चौधरी, राकेश हांडे आदी उपस्थित होते.

पोलीस यंत्रणा निभिर्र्ड

करोनाचे आगमन झाल्यापासून सर्वप्रथम आरोग्याबरोबरच पोलीस यंत्रणेने यास तोंड दिले आहे. परंतु हे करत असताना अनेक पोलीसही करोनाग्रस्त झाले तर अनेक शहिद झाले यामुळे पोलीसांमध्ये कुटुंबियांच्या सुरक्षेची काळजी होती. परंतु कोवीड सेंटर, ग्रीन ज्युस तसेच आता फिव्हर क्लिनीक यामुळे पोलीसांसह त्यांच्या कुटुंबियांवर योग्य वेळी योग्य ते उपचार होणार असल्याने सर्व पोलीस यंत्रणा निर्भिड होऊन करोनाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.

- दिपक पांडे, पोलीस आयुक्त

पोलीस यंत्रणा निभिर्र्ड करोनाचे आगमन झाल्यापासून सर्वप्रथम आरोग्याबरोबरच पोलीस यंत्रणेने यास तोंड दिले आहे. परंतु हे करत असताना अनेक पोलीसही करोनाग्रस्त झाले तर अनेक शहिद झाले यामुळे पोलीसांमध्ये कुटुंबियांच्या सुरक्षेची काळजी होती. परंतु कोवीड सेंटर, ग्रीन ज्युस तसेच आता फिव्हर क्लिनीक यामुळे पोलीसांसह त्यांच्या कुटुंबियांवर योग्य वेळी योग्य ते उपचार होणार असल्याने सर्व पोलीस यंत्रणा निर्भिड होऊन करोनाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com