मका खरेदी केंद्राचा शुभारंभ

30 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरू राहणार
मका खरेदी केंद्राचा शुभारंभ

सटाणा । प्रतिनिधी Satana

सटाणा कृषी उत्पन्न बाजार Satana APMC समिती व सटाणा दक्षिण भाग वि.का. सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय आधारभूत किमतीने मका खरेदी केंद्राचा शुभारंभ Launch of Maize buying Center बाजार समिती शेजारी सटाणा-मालेगाव रस्त्यालगत वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात तहसीलदार जितेंद्र इंगळे व सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांच्या हस्ते करण्यात आला.

सदर योजनेअंतर्गत मका विक्रीसाठी 454 शेतकर्‍यांनी आतापर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी केली आहे. येत्या 30 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नाव नोंदणी सुरू राहणार असून, शेतकर्‍यांना मोबाईलवर यासंदर्भात संदेश पाठविण्यात येणार आहे. तसेच मका खरेदीची मुदत पुढील महिन्यातील 31 जानेवारीपर्यंत आहे. शासनाने मक्यासाठी 1870 रुपये आधारभूत किंमत जाहीर केल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले.

शेतकर्‍यांनी स्वच्छ वाळवून 14 टक्केपर्यंत आद्रता असलेला मका विक्रीसाठी आणावा, असे आवाहन कृउबा सभापती संजय देवरे व दक्षिण सोसायटी चेअरमन मनोहर देवरे यांनी केले आहे.

शेतकरी बांधवांनी शासनाने दिलेल्या वाढीव नोंदणी मुदतीचा फायदा घेऊन ऑनलाइन नाव नोंदणी करून शासकीय योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी केले.

यावेळी दक्षिण सोसायटीच्या व्हा. चेअरमन द्वारका सोनवणे, पांडुरंग सोनवणे, भिका सोनवणे, संदीप साळे, बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे, वखार महामंडळाचे शाखा अधीक्षक संदीप ढवळे, दक्षिण सोसायटीचे सचिव सुनील देवरे, दौलतराव सोनवणे, राजेंद्र गायकवाड, शरद सोनवणे, प्रवीण सोनवणे, राजेंद्र सोनवणे, राहुल सोनवणे, दोधा मोरे, आप्पा नंदाळे, अंजना सोनवणे, अशोक सोनवणे, दौलत सावकार, बाजीराव सोनवणे, बाजीराव देवरे आदिंसह शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, हमाल, मापारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com