दिंडोरीत महालसीकरण अभियानास प्रारंभ

दिंडोरीत महालसीकरण अभियानास प्रारंभ

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

दिंडोरी Dindori शहरातील जनतेने मोठ्या संख्येने लसीकरण vaccination करून घ्यावे व 'करोना मुक्त दिंडोरी अभियान' यशस्वी करावे, असे आवाहन माजी आमदार रामदास चारोस्कर Former MLA Ramdas Charoskar यांनी केले.दिंडोरी येथे मिशन कवच कुंडल अंतर्गत पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने अरुणोदय वाचनालय ईशान्येश्वर अभ्यासिकेत करोना मुक्त अभियान राबविण्यास सुरुवात झाली .त्यावेळी या उपक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार रामदास चांरोस्कर होते. यावेळी चारोसकर यांनी म्हणाले की आरोग्य यंत्रणा करोना मुक्तीसाठी परिश्रम घेत आहे.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मांडगे व पथकाने तालुक्यासाठी लस सुविधा उपलब्ध केली आहे.दिंडोरी शहरातील व तालुक्यातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी लसीकरण करून घेणे काळाची गरज आहे.

दिंडोरी शहरातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन बाळासाहेब जाधव यांनी केले.तर डॉक्टर मांडगे यांनीही करोना मुक्तीसाठी दिंडोरी परिसरातील नागरिकांनी एकत्र यावे असे आवाहन केले .पंचायत समिती सदस्य वसंत थेटे,रणजित देशमुख डॉक्टर भारती चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी भाजप नेते प्रमोद देशमुख,शिवसेना माजी तालुकाप्रमुख सतीश देशमुख,काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड, विठ्ठल अपसुंदे,संतोष मुरुकुटे,सुभाष देशमुख,सचिन देशमुख,प्रदीप घोरपडे,गणेश बोरस्ते,संदीप जाधव,सुजित मुरुकुटे,दीपक जाधव,अरुण गायकवाड,गुलाबतात्या जाधव,निलेश शिंदे,टिल्लू शिंदे,हेमंत पगारे आदी उपस्थित होते.स्वागत नितीन गांगुर्डे यांनी केले.लसीकरण मोहिमेत डॉक्टर कृष्णा उघडे,राजेंद्र नाठे,

आरोग्य सेविका एस. पी.कुलकर्णी, आज्जू सय्यद,जे.जी,जाधव,सुरेश शिंदे,सागर भदाने, उज्वला माळी,डी.बी.राउत,हिरा अवतार, आरोग्य सेवक महाले,छाया जानराव,निलेश खरे,अजित पगारे,गोदावरी महाले, पी. एस.बेले,डी. व्हीं. अंभोरे,एस. आर. भदने,सूरज शिंदे,अश्विनी गांगुर्डे,रंजना गांगोडे,कविता बैरागी,कल्पना पगारे, स्वाती केदार आदींनी सहकार्य केले.अरुणोदय वाचनालयात रोज सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत लसीकरण सुरू राहणार आहे.

Related Stories

No stories found.