काँग्रेसच्या 'हाथ से हाथ जोडो' अभियानाचा शुभारंभ

काँग्रेसच्या 'हाथ से हाथ जोडो' अभियानाचा शुभारंभ

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

काँग्रेसच्या (congress) ' हाथ से हाथ जोडो ' अभियानाचा शुभारंभ मंगळवारी (दि.२४) सकाळी १०:३० वाजता काँग्रेस भवन मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आ.नाना पटोले (State President of Congress, MLA Nana Patole) यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी सहप्रभारी ब्रिज किशोर दत्त यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी काँगेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा तसेच पक्ष प्रवेश सोहळाही होणार आहे.

त्यानंतर ११:३० वाजता हॉटेल एस.एस.के, तिडके कॉलनी ,नाशिक येथे आ.नाना पटोले व सह-प्रभारी ब्रिज किशोर दत्त, ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदासजी माळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नाशिक पदवीधर विधानपरिषद उमेदवाराच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com