श्रीमंत सुवर्ण संचय कर्ज योजनेचा शुभारंभ

संधीचा लाभ घेण्याचे वाजे यांचे आवाहन
श्रीमंत सुवर्ण संचय कर्ज योजनेचा शुभारंभ

डुबेरे । वार्ताहर Dubere

येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेने (Shrimant Thorale Bajirao Peshwa Patsanstha) ‘श्रीमंत सुवर्ण संचय कर्ज योजने’चा शुभारंभ करून सोने खरेदीची मनीषा बाळगणार्‍या सभासदांना नवीन वर्षाची भेट दिली आहे.

संस्थेच्या कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje) व गोविंद दंडे अ‍ॅण्ड सन्सचे संचालक अनिल दंडे (Anil Dande, Director, Govind Dande & Sons) यांच्या हस्ते ‘श्रीमंत सुवर्ण संचय कर्ज योजने’चा शुभारंभ करण्यात आला. या योंजनेचे पहिले ग्राहक सोमनाथ वाजे याना मान्यवरांच्या हस्ते सोन्याचे दागिने देऊन गौरविण्यात आले. शंभर कोटींचा टप्पा पार करणारी संस्था आणि शंभर वर्षांची ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेली पेढी यांच्यात या योजनेच्या माध्यमातून करार झाला आहे. तो सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी झाला असल्याचे राजाभाऊ म्हणाले.

पतसंस्था चालवितांना येणार्‍या अडचणी सर्वांना सर्वश्रूत आहे. सोनेतारणपेक्षाही सुवर्ण संचय योजना अधिक चांगली असून पतसंस्थेने एक धाडसी पाऊल टाकलेले आहे. त्याचा फायदा संस्थेसह ग्राहकांनाही नक्कीच होणार आहे. चांगल्या योजनेचा शुभारंभ संस्थेने केल्याबद्दल राजाभाऊंनी संचालक मंडळाचे धन्यवाद मानले. या योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

श्रीमंत पतसंस्था व दंडे ज्वेलर्सचा (Dande Jewelers) या योजनेच्या माध्यमातून हा गोल्डन शेकॅहण्ड (Golden Shakehand) झाला आहे. या दोन्ही संस्थांनी ग्राहकांना चोख सोन्याबरोबरच अल्पदरात कर्ज सुविधा (Low cost loan facility) उपलब्ध करुन देत सोने खरेदीची संधी निर्माण करुन दिली आहे. आपल्याकडे सोनं नसतांना सोन्यावर कर्ज देणारी ही पहिली पतसंस्था असल्याचे दंडे ज्वेलर्सचे संचालक अनिल दंडे म्हणाले. सुरक्षित गुंतवणूक कोठे करायची व सुरक्षित कर्ज कसे द्यायचे ही सर्वात मोठी समस्या आज पतसंस्थांपूढे आहे.

या योजनेच्या माध्यमातून संस्थेने सुरक्षित कर्ज वाटप करण्याचे ठरविले असल्याचे चेअरमन नारायण वाजे म्हणाले. या योजनेचा संस्थेच्या जिल्हाभरातील सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सरपंच अर्जुन वाजे, शरद काकड, माजी सरपंच रामनाथ पावसे, ज्ञानेश्वर कुर्‍हाडे, दंडे ज्वेलर्सचे व्यवस्थापक याकूब शेख, संचालक विष्णू भालेराव, काशिनाथ वाजे, आनंदा सहाणे, प्रा. एकनाथ माळी, गणेश वाजे, गोरख ढोली उपस्थित होते. सूत्रसंचलन बँकेचे व्यवस्थापक आयुब शेख यांनी केले. आभार महेश कुटे यांनी मानले.

ग्रामीण भागात लग्नाच्यावेळी मुलीला सोने करण्यासाठी वडीलांना जमिन गहाण ठेवण्याची किंवा सावकाराकडे जाण्याची गरज भासते. ती वेळ आता कुणावरही येणार नाही. या योजनेच्या माध्यमातून अतिशय माफक दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ग्राहकाला आपल्या दागीन्यांची निवड करण्याची व्यवस्था आहे. तसेच मंजूरीवर 25% सुटही देण्यात येणार आहे. 30 टक्के रक्कम गुंतवून सोने खरेदीची संधी संस्थेने ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहे.

अरुण वारुंगसे, व्हाईस चेअरमन

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com