कृषी ट्रेन
कृषी ट्रेन
नाशिक

कृषी ट्रेन; यामुळे खासदार गोडसे राहिले कार्यक्रमापासून वंचित

व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे दिला हिरवा झेंडा

Gokul Pawar

Gokul Pawar

देवळाली कँम्प | Deolali Camp

मध्य रेल्वेच्या देवळाली ते दानापूर या पहिल्या किसान रेल्वेचा शुभारंभ व्हिडीओ लिंक व्दारे केंद्रिय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते तर

व रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथून संपन्न झाला. या व्हिडीओ कॉन्फरन्स सोहळ्यात रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री छगन भुजबळ, खा.भारती पवार, खा.डॉ

नरेंद्र जाधव, आमदार सरोज आहेर आदिंसह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. मात्र देवळाली रेल्वे स्टेशनवर उपस्थित राहून ही खा.हेंमत गोडसे यांना तांत्रिक कारणामुळे उद्घाटनप्रसंगी सहभागी होता आले नाही यामागे रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणाचा आरोप खा.गोडसेसह उपस्थित देवळाली करांनी निषेध व्यक्त केला.

यावेळी रेल्वे स्थानकावर भुसावळ डिव्हिजनचे एडी आर एम मनोज कुमार सिन्हा, डीएसटीई विजय खैंन्ची, देवळाली स्टेशन प्रबंधक एम के सिन्हा स्थानिक शेतकरी अशोक पाळदे, कैलास गोडसे, रामदास ढोकणे आदि ऑनलाइन सोहळ्यात सहभागी झाले होते. अर्धा तास चाललेल्या या सोहळ्यात दिल्ली येथून हिरवा झेंडा दाखविल्यानंतर गाडीच्या चालकाने इंजीन सुरू करत गाडी पुढील प्रवासाला रवाना झाली.

दरम्यान देवळाली रेल्वेस्थानकावर खा.हेंमत गोडसे ऐन वेळेस उपस्थित झाले मात्र त्यांना या सोहळ्यात सहभागी होता आले नाही त्यांच्या साठी रेल्वे प्रशासनाने संगणकाची व्यवस्था केली मात्र या व्हिडीओ कॉन्फरन्स ची लिंक सुरू झाली नाही. त्यामुळे ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही प्रक्रिया पासून वंचित राहावे लागले त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करतांना केंद्र शासनाच्या आदेशावरून शिवसेनेच्या खासदारास डावले का असे व्यक्तव्य केले. यावेळी रेल्वे प्रशासनावविरोधात घोषणा दिल्या त्यात राजेश फोकणे, सचिन कोठुळे, संजय गोडसे, सुरेश कदम, नाना काळे आदि उपस्थीत होते

नाशिक जिल्हयातून द्राक्षे, कांदे आदिसह नगदी पिके कमी वेळात सुरक्षीत पणे परराज्यात पोहचणे कामी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात कृषी ट्रेनची मागणी केली होती. यावर केंद्राने सकारात्मक प्रतिसाद देत देवळाली ते दानापूर बिहार ही देशातील पहिली रेल्वे सुरु केली त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com