‘बॉश’च्या सुवर्ण महोत्सवात ‘क्रिन’ प्रकल्पाचा प्रारंभ

जगभरातील मान्यवरांची हजेरी
‘बॉश’च्या सुवर्ण महोत्सवात ‘क्रिन’ प्रकल्पाचा प्रारंभ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येथील बॉश उद्योग समुहाला(Bosch Industry Group) 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरातील बॉश परिवाराशी सलग्न उद्योजकांसोबतच आनंदोत्सव साजरा करण्यात आला.सातपूर येथील पूर्वीच्या मायको ( MICO )आताच्या बॉश उद्योगाला नाशिकला 50 वर्ष पूर्ण होत आहेत.त्यानिमित्त वाटचालीतील महत्वाच्या टप्प्यांंचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत कंपनीचे नाशिकमधील अत्याधुनिक क्षमतेचे नव्या रुपातील उत्पादन ‘क्रिन’ (Common Rail Injector) च्या उत्पादन प्लँटचा शुभारभ करण्यात आला.

यावेळी पहिले उपाध्यक्ष सौमित्र भट्टाचार्य यांच्या समवेत कंपनीच्या मान्यवरांच्या हस्ते पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी कॉस्टन म्युलर व प्रभू पांडूरंग यांनी कंपनीच्या विकासाचे गमक सादर केले. त्यांनी उत्पादन, मानव संसाधन, सप्लाय चेन, कस्टमर केअर आदी विषयात कंपनीने दिलेल्या विशेष योगदानाची माहिती सादर केली.

स्नेहा उमप या तरुणीने सँड आर्टच्या माध्यमातून बॉश कंपनीच्या 50 वर्षाच्या वाटचालीची झलक दाखवत उपस्थितांची दाद मिळवली. बॉशच्या संगीत पथकाने तयार केलेल्या बॉश प्रार्थनेचे गायन यावेळी करण्यात आले.नाशिक प्लँटचे तांत्रिक उपाध्यक्ष अनंत रमण व कमर्शिअल उपाध्यक्ष रश्मी रंजन भूषण यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्मिक महाव्यवस्थापक श्रीकांत चव्हाण यांनी आभार मानले.

क्रिन नव्या रुपात

कॉमन रेल इंजेक्ट हे बॉशचे नाशिकमधील महत्वाचे उत्पादन होते. मध्यंतरी बीएस 4 व बीएस 6 यातील बदलामुळे उत्पादन प्रक्रियाच धोक्यात आली होती. नाशिकलां प्रिसिजन काम होत असल्याने बॉश मुख्यालयाने आशियातील एकमेव उत्पादन नाशिकमध्ये करण्याची मान्यता दिली आहे.

हे उत्पादन ताकदवान तयार करण्यात आले असून मोठ्या ट्रक टेम्पो सारख्या दमदार वाहनांच्या गरजांचाही यात विचार करण्यात आला आहे. या उत्पादन प्रक्रियेचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com