
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad
पदवीधर मतदारसंघाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास येथील महसूल आयुक्त कार्यालयात सुरुवात झाली असून गेल्या दोन दिवसात एकूण 19 उमेदवारांनी अर्ज नेले आहेत...
उमेदवारी अर्ज भरण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली असून आतापर्यंत 19 उमेदवारांनी अर्ज नेले आहे. त्यामध्ये धनराज विसपुते, संगीता विसपुते, डॉ. आशिष जैन, सोमनाथ गायकवाड, शुभांगी पाटील, शशांक हिरे, किरण दराडे, अॅड. जुबेर शेख, उदय थोरात, कन्हैयालाल माळी, डॉ. सुधीर तांबे, रवींद्र वळवी, अविनाश गायकवाड, ईश्वर पाटील, नितीन सरोदे, संजय शिंदे, बाळासाहेब घोरपडे, संगीता घोरपडे, विकास मोरे, आदी उमेदवारांनी अर्ज नेले असून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 12 जानेवारी पर्यंत आहे.