मुंगसरा : युवकांचा व्हॉट्सअप ग्रुप ठरला ग्रामविकासाचा आधार

अनेक समस्या मार्गी
व्हाट्सएप ग्रुप मुंगसरा
व्हाट्सएप ग्रुप मुंगसरा

गिरणारे : करोनाच्या महामारीने गावपातळीवर ग्रामसभा, सार्वजनिक बैठका, भेटीगाठी बंद आहे. अशात गावातील मुद्द्यांवर संवाद व्हावा म्हणून मुंगसरा येथील युवकांनी व्हाट्सप चा आधार घेतला आहे.

नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील मुंगसरा (ता.नाशिक) येथील युवक ऍड प्रभाकर वायचळे व सुरेश भोर या युवकांनी सुरू केलेल्या व्हाट्स ग्रुपने गावातील अनेक मुद्दे प्रश्न मार्गी लावण्याचे कामकाज केले आहे. दरम्यान करोनाच्या लॉकडाऊनमध्ये नागरिक व लोकप्रतिनिधी, अधिकारी यांचा संवाद व्हाट्स अपवर घडवून आल्यानेच गावातील कित्येक प्रश्न मार्गी लावता आले, अशी माहिती प्रभाकर वायचळे यांनी दिली.

सुरवातीला त्यांनी अधिकारी, लोकप्रतिनिधी, नागरिक यांना ग्रुपमध्ये सामाविष्ट करून घेतले. त्यानंतर ग्रामस्थांच्या चर्चेतून गावातील अनेक समस्या सोडवण्यास मदत झाली. यापैकी पावसाळपूर्व गटारींचे साफसफाई, शौचालय टाक्या दुरुस्ती व साफसफाई, रेशनिंगची समस्या, अधिकारी वर्गाच्या उपस्थिती बाबत, महिलांना मोफत मास्क वाटपाचा कार्यक्रम तसेच घंटागाडीचा प्रयोग आदी कामे या माध्यमातून करण्यात आली.

दरम्यान येथील युवकांनी ग्रामविकासाचा ध्यास घेतला व गावासाठी विविध प्रयोग राबविण्यात आले. संवाद व पाठपुरावा करण्याच्या पद्धत्तीने आपण गावात मूलभूत कामे करू शकतो, यंत्रणेला कर्तव्याची जाणीव करून देता येते हेच मुंगसरा गावाच्या युवांच्या प्रयत्नातून शक्य झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com