विनायक मेटे
विनायक मेटे
नाशिक

विठ्ठल सगळं करणार असेल तर मुख्यमंत्र्यांनी पायउतार व्हावे

विनायक मेटेंचा घणाघात

Gokul Pawar

नाशिक : विठ्ठल सगळं करणार असेल तर तर तुमची गरज काय ? असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सरकारमधून पाय उतार व्हावे, असा घणाघात शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला.

विश्रामगृह येथे बुधवारी (दि.१) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हे सरकार निराशावादी आहे. सगळं देवावर सोडले. त्यांना सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नाही.

करोना परिस्थिती हाताळण्यास हे सरकार अपयशी ठरले आहे. मराठा समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. मराठा आंदोलकांवरिल गुन्हे अद्याप मागे घेण्यात आले नाही. कोपर्डिच्या बहिणीला अजून न्याय मिळाला नाही. हे सरकार मराठा विरोधी असल्याचा गंभीर आरोप करत पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. इंदुरिकर महाराज यांना टार्गेट केल जात आहे. वीज बिलाच्या नावाखाली गरिबांना लुटल जात आहे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ चुकिची असून राज्याने किती टॅक्स वाढवला हे तपासावे लागेल असे ते म्हणाले.

कृषी मंत्र्यांनी शेतकर्‍याचा मुलगा म्हणुन काम करावे. राज्याचे कृषी खाते म्हणजे आंधळा दळतय व कुत्र पीठ खातयं अशी अवस्था आहे.

दादा भुसे यांनी स्टिंग आॅपरेशन केले पण इतक्या दिवस ते झोपले होते का असा सवाल मेटे यांनी विचारला. अशी नौटंकी करण्यापेक्षा शेतकर्‍याचा मुलगा हे ते त्यांनी कामातुन सिध्द करावे असे आवाहन मेटे यांनी दिले.

Deshdoot
www.deshdoot.com