दरी-मातोरी येथे आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपण

भजनात रमले वारकरी
वारकरी
वारकरी

नाशिक : जिल्ह्यातील हजारो वारकरी करोनामुळे पंढरपूरला जाऊ शकले नाहीत. त्यांनी आपापल्या पद्धतीने आषाढी एकादशी साजरी केली. दरी, मखमलाबाद आणि मुंगसरे परिसरातील ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त दरीआई माता मंदिर परिसरात वृक्षारोपण केले.

दरीआई माता युवा मंडळ आणि मखमलाबाद-मातोरी, मुंगसरे-दरी पंचक्रोशीतील वारकऱ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपण मोहीम आयोजित केली होती. कोरोनामुळे शासकीय निर्बंधांचे पालन करत वृक्षारोपण केल्याची माहिती भारत पिंगळे यांनी दिली.

या परिसरात वड, पिंपळ, काशीद अशी देशी प्रकारची ५०० पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली. वृक्षारोपणांनंतर सर्वानी भजन केले आणि विठोबाची आळवणी केली. या उपक्रमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com