टाकेद : कारची दुचाकीस्वारांस धडक; दोघे गंभीर
नाशिक

टाकेद : कारची दुचाकीस्वारांस धडक; दोघे गंभीर

Gokul Pawar

Gokul Pawar

इगतपुरी : टाकेद येथून मोटारसायकलवरून धामणगाव येथे जाणाऱ्या दुचाकीस धडक दिल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. काळू तेलम (१७), हृतिक गोरे (२०) अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.

दरम्यान (दि.१५) रोजी हे दोघे धामणगाव येथे काही कामानिमित्त जात असतांना हा अपघात घडला. समोरून येणाऱ्या कारने (एम एच ०३ बी डब्लू ४४०८) यांच्या दुचाकीस जोरात धडक दिली. कारचालकाने या दोघांना जखमी अवस्थेत सोडून पोबारा केला. येथील स्थानिकांनी तात्काळ जवळच्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दोघांना दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com