शिवजयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे भव्य मशाल रॅली
नाशिक

शिवजयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे भव्य मशाल रॅली

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : नाशिक जिल्हा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड तर्फे जागतिक शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री भव्य मशाल रॅली काढण्यात आली.

मशाल रॅलीची सुरुवात नाशिकच्या मेनरोड वरील जुन्या महापालिकेच्या प्रांगणातून झाली. मध्यरात्री अकरा वाजता सुरू झालेल्या मशाल रॅलीत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसह जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकरी व मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

तुमचं आमचं नात काय,जय जिजाऊ जय शिवराय रक्ता रक्तात भिनलय काय,जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत मेनरोड शालीमार मार्गे गाडगेमहाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करत मशाल रॅलीची सांगता मध्यवर्ती बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ़ पुतळ्याच्या प्रांगणात झाली.

यावेळी शिवव्याख्याते नितीन डांगे पाटील यांच्या व्याख्यानाचा व जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास मान्यवरांच्या हस्ते अभिवादन केल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगर प्रफुल्ल वाघ यांनी केले.

Deshdoot
www.deshdoot.com