आम्ही सारे नागवंशीय संस्थेतर्फे शमीभा पाटील यांना नांगेली रत्न पुरस्कार
नाशिक

आम्ही सारे नागवंशीय संस्थेतर्फे शमीभा पाटील यांना नांगेली रत्न पुरस्कार

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : आम्ही सारे नागवंशीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे महिला दिनानिमित्त नांगेली रत्न व स्त्रीरत्न पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या ‘शमीभा पाटील यांना नांगेली रत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

दरम्यान दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या महिलांना गौरविण्यात येते. यावर्षी जिल्ह्यातील सहा महिलांना स्त्रीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये महिला पोलीस रुपाली बोबडे, प्रा. डीडी कुचेकर, वैशाली डुंबरे, ज्योती देशमुख, मनीषा गांगोडे, आम्रपाली वाकळे आदींचा समावेश आहे.

सोमवारी (दि.०९) या पुरस्कारांचे वितरण प्रसिद्ध साहित्यिक प्रा. गंगाधर अहिरे, करुणासागर पगारे, माया खोडवे आदींच्या हस्ते होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com