इंग्रजी शाळांच्या फी आकारणीला चाप लावावा; शिवसेनेची मागणी
नाशिक

इंग्रजी शाळांच्या फी आकारणीला चाप लावावा; शिवसेनेची मागणी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. परंतु इंग्रजी माध्यमांच्या शाळा या आॅनलाईन क्लासेस घेत आहेत. शाळांकडून अतिशय मनमानी पध्दतीने शुल्क विद्यार्थ्यांकडून आकरले जात असून तगादा लावला जात आहे.

शाळांच्या या मनमानीला शासनाने चाप लावावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. महानगर प्रमुख महेश बडवे यांनी मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे राजेंद्र अहिरे यांना निवेदन दिले.

इंग्रजी शाळांकडून खासगी आॅनलाईन क्लास घेतले जात आहे. शहरात सर्वत्र मोबाईल. इंटरनेट नेटवर्कला रेंजची अडचण भेडसावत आहे. अशा वेळेस अशा ऑनलाईन क्लासचा विद्यार्थीनी फारसा उपयोग होणार नाही. भविष्यात शाळा सुरू झाल्यावर हा अभ्यासक्रम पुन्हा घेतला जाणार नाही.

विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे सर्व पालकांनी फीचे मेसेज पाठवून तगादा लावू केला आहे. लाॅकडाऊनच्या या काळात सर्वच क्षॆत्रात नोकरी, व्यवसायात आर्थीक मंदी निर्माण झाली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात फीमध्ये जास्तीत जास्त सवलत मिळावी.

महाराष्ट्र सरकारने ‘वार्षिक फी ‘ न घेण्या संबंधी वारंवार सुचना करुनही नाशिक शहरातील खाजगी शिक्षणसंस्था ह्या वेगवेगळ्या युक्ती करुन पालकांकडून फी ची मागणी करीत आहेत. अशा शिक्षणसंस्थांवर कारवाई करण्यात यावी , सदर समस्या गंभीर असून आपण यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देताना शिवसेना महानगर प्रमुख महेश बडवे, उपमहानगर प्रमुख सुनिल जाधव, योगेश देशमुख, विभाग प्रमुख स्वप्निल औटे, विभाग संघटक पोपट शिंदे, अमित भगत आदी उपस्थित होते.

खाजगी शाळा फी साठी तगादा लावत असल्यास संबंधित पालकांनी पुराव्यानिशी स्थानिक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी संपर्क साधावा.
महेश बडवे, महानगर प्रमुख नाशिक

Deshdoot
www.deshdoot.com