नवीन नाशिक : गळफास घेत एकाची आत्महत्या
नाशिक

नवीन नाशिक : गळफास घेत एकाची आत्महत्या

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक। राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.11) दुपार नवीन नाशिक येेथील तोरणा नगर भागात घडली.

सुभाष रामभाऊ लेंबे (52, रा. तोरणानगर, उर्दुशाळेजवळ, नवीन नाशिक) असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लेंबे यांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास राहत्या घरात भिंतीच्या खिळ्याला दोरी आडकवून गळफास घेत आत्महत्या केली.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com