नाशिक शहरात करोनाग्रस्तांची संख्या २ हजारावर

मृत्युही शतकापार
नाशिक शहरात करोनाग्रस्तांची संख्या २ हजारावर
करोनाबाधित रुग्णसंख्या

नाशिक : शहरात करोना रुग्णांचे संसर्ग प्रचंढ वेगात पसरु लागला असुन गेल्या तीन दिवसात नवीन रुग्ण हे शंभराच्यावर झाल्याचे अहवालातून समोर आल्याने शासकिय व महापालिका यंत्रणा कामाला लागली आहे. शहरात शनिवारी (दि.२७) १२७ आणि रविवारी (दि.२८) १०० व सोमवारी (दि.२९) १२३ असे तीन दिवसात ३४४ नवीन रुग्ण आढळून आले आहे.

शहरातील रुग्णांचा आकडा २०४० आणि मृतांचा आकडा १०४ पर्यत गेला आहे. परिणामी शहरातील विविध भागात करोनाग्रस्त राहत असलेला परिसर व इमारत - बंगले हे प्रतिबंधीत क्षेत्रांंचा आकडा २०९ इतका झाला आहे. रुग्णांचा वाढत असलेला वेग पाहता आता शहरातील स्थिती धोकादायक बनत चालली आहे.

शहरात गेल्या पंधरा दिवसात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला असुन गेल्या चार दिवसात ४३५ रुग्ण वाढले असुन ही वाढ प्रति दिन सरासरी नुसार १०८ पर्यत जाऊन पोहचली आहे. दि.१ जुनला शहरातील रुग्ण सख्या अवघी 234 इतकी होती, ती २८ जुनपर्यत २०४० इतकी झाली आहे. यावरुन रुग्ण वाढीचा वेग प्रचंढ वाढला आहे. शहरातील प्रतिदिन रुग्णवाढ ही जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात २०० पर्यत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली असुन याच दिशेने करोनाग्रस्तांची वाढ होऊ लागली आहे. अशीच स्थिती मृतांच्या आकडेवारीतून समोर येत आहे. १ जुनला करोनामुळे मृतांचा आकडा केवळ ९ इतका होता. तो २९ दिवसात १०४ झाला आहे.

जुनच्या शेवटच्या आठवड्यात मृताचा वेग प्रतिदिन ५ ते ६ इतका झाल्याने हा आकडा शतकापार गेला अहे. गेल्या पंधरा दिवसात शहरात ७२ करोनाग्रस्तांचा मृत्यु झाला आहे. १४ जुन रोजी महापालिका क्षेत्रात ३२ करोना बाधीतांचा मृत्यु झाला होता. आता पुढच्या पंधरा दिवसात मृतांची आकडेवारी तीनपटीने म्हणजे १०४ पर्यत गेली आहे. वाढते रुग्ण व मृतांची गंभीर दखल घेत महापालिका व आरोग्य विभागाकडुन नवीन रुग्णांना खाटा उपलब्ध करुन देण्याची तयारी केली जात आहे.

शहरात सोमवारी (दि.२९) १२९ इतकी नवीन करोनाग्रस्तांची नोंद झाली होती. गेल्या गुरुवारी ४, शुक्रवारी १०, शनिवारी (दि.२७) १०, रविवारी १ आणि सोमवारी (दि.२९) रोजी ५ अशा सलग ३० मृत्यु झाले आहे.

सोमवारी मृत्यु झालेल्या ४५ वर्षीय महिला रा. पंचवटी, ६३ वर्षीय पुरुष रा. हिरावाडी, ५७ वर्षीय पुरुष रा. पिंजरघाट जुने नाशिक, ५४ वर्षीय पुरुष रा. उपनगर व ५२ वर्षीय महिला रा. पचवटी यांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com