नाशिक

नाशकात पेट्रोल डिझेल दरवाढविरोधात राष्ट्रवादीचे गांधीगिरी आंदोलन

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Gokul Pawar

नाशिक : एकही भुल कमल का फुल; पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या अशा घोषणा देत पेट्रोल/ डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फुल देऊन केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या दरवाढीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.

पेट्रोल, डिझेल दर कमी करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करावे व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी यावेळी बोलतांना केली.

नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ त्र्यंबक नाका येथील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. अच्छे दिनच्या घोषणेला भुलून निवडून दिलेल्या केंद्रातील भाजप सरकारने नियमितपणे केलेल्या दरवाढीबद्दल पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी “गुलाब पुष्प” देऊन गांधीगिरी आंदोलन केले.

यावेळी एकही भुल कमल का फुल; पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजे यासोबतच केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना वरील मागणीचे निवेदन देण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com