हरसूल : ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांकडून १४० कुटुंबांना मदतीचा हात

हरसूल : ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांकडून १४० कुटुंबांना मदतीचा हात

हरसूल : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा केंद्रातील २० गावांतील १४० कुटुंबांना प्राथमिक शिक्षकांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

दरम्यान ठाणापाडा केंद्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी एकत्र येत गरजूंसाठी मदत निधी गोळा केला. यावेळी जीवनावश्यक वस्तूंचे किट सोशल डिस्टन्स व शासनाच्या नियमांचे पालन करीत वाटप केले.

ठाणा पाडा परिसरातील वीस गावांतील भूमीहीन, दिव्यांग, विधवा व जेष्ठ नागरिक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ज्ञान दानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांनी निराधारांचा आधार होत खारीचा वाटा उचलला आहे.

या प्रसंगी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मा.मुरकुटे , गटशिक्षणाधिकारी मा.राजेंद्र शिरसाठ , ठाणापाडा बीटाचे शिक्षण विस्ताराधिकारी मा.आर.आर.बोडके, केंद्रप्रमुख मा.सौ.रजनी वरखेडे, मुख्याध्यापक तुकाराम कामडी, दिलीप महाले ,अंबादास खोटरे, आदी शिक्षक व तरुण सहभागी होते.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com