नाशिक शहरात पावसाची जोरदार हजेरी

नागरिकांची तारांबळ; रस्ते तुडुंब
City Rain
City Rain

नाशिक : मोसमी वारे पुन्हा राज्यभर सक्रिय झाले असून नाशिक शहर व जिल्ह्यात सोमवारी (दि.२९) दमदार पाऊस कोसळला. दुपारनंतर शहर व उपनगरिय परिसरात धो धो पाऊस पडला.

दीड ते दोन तास चाललेल्या पावसाने मुख्य बाजारपेठांमधे दाणाफाण उडवली. ठिकठिकाणी रस्त्यावर पाण्याचे तळे व डबके साचले होते. पावसामुळे वातावरणातील उकाडा नाहिसा होऊन गारवा पसरला होता.

मागील दहा ते पंधरा दिवसांपासून जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा होती. जुनच्या प्रारंभी निसर्ग चक्रिवादळ व त्यानंतर मान्सूनचे आगमन यामुळे पहिल्या दहा ते बारा दिवसात समाधानकारक पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र पावसाने जिल्ह्यात पाठ फिरवली होती. मागील एक दोन दिवसांपुर्वी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. पण दमदार पावसाची प्रतीक्षा कायम होती. अखेर सोमवारी पावसाचे पुनरागमन झाले.

सकाळपासूनच आकाश गच्च ढगांनी भरले होते. हवामान शाळेनही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता. दुपारनंतर हा अंदाज खरा ठरवत धुवाधार पावसाला सुरुवात झाली. काहि ठिकाणी मध्यम ते काहि ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे मेनरोड, एमजी रोड, रविवार कारंजा या मध्यवर्ती बाजारपेठेत दुकानदार व ग्राहकांची तारांबळ उडाली. शहरात ठिकठिकाणि पाणी साचले होते. वाहनचालकांची तारांबळ उडाली. पावसानंतर उकाडा नाहिसा होऊन अल्हादायक वातावरण झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com