जिल्हाधिकारी सूरज मांढरे
जिल्हाधिकारी सूरज मांढरे
नाशिक

गर्दीचे कारण ठरू नका, स्वतःवर बंधने घाला

जिल्हाधिकारी सूरज मांढरे

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : शहरासह जिल्ह्यांत कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत दिसुन या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने नियम पाळून कोरोनाचा हरवायचे आहे, तसेच यावर प्रतिबंध करणे हाच उपाय असल्याने प्रत्येकाने स्वतःवर बंधने घालण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

सध्या करोनाचा प्रभाव शहरासह ग्रामीण भागात वाढत आहे. अनलॉक च्या माध्यमातून शहरातील दुकाने सुरू असून आजपासून सलून, पार्लर देखील काही अटीवर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे लॉक डाऊन न करता नागरिकांनी स्वतःवर बंधने लादत करोनाचा मुकाबला करावा लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

ते नागरिकांना आवाहन करताना म्हणाले की , आपण गेले अनेक महिने सर्वजण मिळून करोनाशी मुकाबला करीत आहोत आणि आता ही लढाई निर्णायक टप्प्यावर आली आहे.. हे आपल्यापैकी प्रत्येकावर आलेले संकट आहे आणि प्रत्येकाला त्याचा मुकाबला करावा लागणार आहे.

आपल्या खंडप्राय देशामध्ये जिथे जगाची १/६ लोकसंख्या राहते तिथे उपचार करून यावर मात करणे किती आव्हानात्मक आहे याची जाणीव सर्वांनाच आहे. त्यामुळे प्रतिबंध करणे हाच यावरचा योग्य उपाय आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पक्का निर्धार केला पाहिजे की आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या सग्या सोयऱ्यंसाठी, आपल्या मित्र परिवाराच्या सुरक्षिततेसाठी आपण स्वतःवरच काही बंधने घालून घ्यावी. तसेच आपण स्वतः गर्दीला कारण ठरू नये.

आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी गर्दी नियंत्रणाची पक्की व्यवस्था करावी. त्यासाठी तेथील रचनेत आवश्यकतेनुसार बदल करावेत. त्याचप्रमाणे कोणतेही कार्यक्रम छोटेखानी का असेना आयोजित करू नये. इतरांनी जरी कार्यक्रम ठेवण्याची चूक केली तर आपण त्यात शक्यतो सहभागी होऊ नये. अनावश्यक प्रवास तर टाळावाच, असे त्यांनी आवाहन केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com