संत निवृत्तीनाथ महाराज
संत निवृत्तीनाथ महाराज
नाशिक

संत निवृत्तीनाथ महाराज पादुकांचे शिवशाहीने पंढरपूरकडे प्रस्थान

२० भाविकही रवाना

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर : संत निवृत्तीनाथ महाराज पादुकांचे आज पंढरपूर वारी साठी शिवशाही बसने प्रस्थान झाले. या वारीत २० वारकरी सामील होते.

संत निवृत्तीनाथ मंदिरात पादुका पूजन झाले. मंदिरापासून पायी निघालेली पालखी कुशावर्त तीर्थावर आली. या वेळी अभिषेक घालण्यात आला. येथे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी पालखीचे स्वागत केले. तेथून पायी येत त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर शिवशाही बस मध्ये पालखी रवाना झाली.

करोना महामारी नष्ट व्हावी या साठी संत निवृत्तीनाथ महाराजांना तसेच श्री हरी पांडुरंगाला आषाढी एकादशीला प्रार्थना करणार असल्याचे संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पवन कुमार भुतडा, पूजारी सचित्तानंद गोसावी यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com