देवळा : भाजप तालुका पदाधिकाऱ्यांचे तहसीलदारानां निवेदन
नाशिक

देवळा : भाजप तालुका पदाधिकाऱ्यांचे तहसीलदारानां निवेदन

Gokul Pawar

Gokul Pawar

वाजगाव : अवकाळी पाउसामुळे शेतकऱ्यांची पिके उध्वस्थ झाली असल्याने तत्कालीन सरकारने सरसकट पंचनामे करून दुष्काळी अनुदान जाहीर केले पण या अनुदानापासून तालुका प्रशासनाच्या उदासिन भुमिकेमुळे तालुक्यातील हजारो शेतकरी बांधव वंचित आहे त्यांना त्वरित अनुदान देण्यात यावे अशी मागणी भाजप तालुका पदाधिकारी यांनी आज (दि.२४ रोजी)निवेदनाद्वारे देवळा तहसीलदार यांचेकडे करण्यात आली.

निवेदनाचा आशय असा की, अवकाळी पाउसामुळे शेतकऱ्यांची पिके पुर्णपणे उध्वस्थ झाली होती. तत्कालीन सरकारने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेले होते. परंतु प्रशासकीय उदासिन भूमिकेमुळे आजही देवळा तालुक्यातील हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. त्या वंचित शेतकऱ्यांना आपल्या विभागामार्फत कहिधी संपर्क साधला गेलेला नाही. व त्या शेतकऱ्यांना संपर्क करणे संदर्भातील अशी काही यंत्रनाही आपल्या विभागाकडून कार्यान्वित केलेली नाही.

तालुक्यातील हजारो शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत असतांना आपल्या विभागाने दुष्काळ निधी जिल्हा प्रशासनास परत पाठवला हि दुर्दैवी बाब आहे. तरी देवळा तालुक्यातील अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना त्वरीत मदत व्हावी हि अशी मागणी भाजत देवळा तालुका पदाधिकारी यांनी आज दि.२४ रोजी निवेदनाद्वारे देवळा तहसीलदार यांचेकडे करण्यात आली.

निवेदनावर भाजप देवळा तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, भाजप युमो अध्यक्ष दीपक जाधव, माजी तालुकाध्यक्ष सुनील देवरे, शहर अध्यक्ष्य विजय आहेर, किसान आघाडी तालुकाध्यक्ष दिनेश देवरे, वैजिनाथ देवरे, मोठाभाऊ सूर्यवंशी, भास्कर पवार, सागर शिंदे, भाऊसाहेब आहेर, विठोबा चव्हाण, राहुल देवरे, नाना साबळे, मोहनदास गवळी, शांताराम गुंजाळ, बाळसाहेब जाधव, अनिल गुंजाळ, पवन अहिरराव, धनंजय आहेर, सुरेश देवरे, दिपक आहेर, निंब निकम आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

सातच्या अस्मानी संकटात पूर्णता हताश झालेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी तत्कालीन सरकारने सरसकट पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करून देण्यात आली, पण तालुका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे देवळा तालुक्यातील हजारो वंचित राहिले त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर त्वरित अनुदान वर्ग करण्यात यावे.
-दिनेश देवरे, किसान आघाडी, देवळा तालुकाध्यक्ष

Deshdoot
www.deshdoot.com