कंरजवण येथे विजेचा धक्का लागुन मुलाचा मृत्यू
नाशिक

कंरजवण येथे विजेचा धक्का लागुन मुलाचा मृत्यू

दिंडोरी तालुक्यातील घटना

Gokul Pawar

दिंडोरी : तालुक्यातील कंरजवण येथे विजेचा धक्का लागुन १७ वर्षीय मुलाचा मृत्यु झाला आहे. करंजवण येथील वृतीक केशव पवार, (वय १७) हा रविवारी ११ वाजेच्या दरम्यान गावाजवळील एकनाथ पुंजाजी पिंगळे यांच्या शेताजवळ आंब्याचे झाडाचे डहाळे तोडण्यासाठी गेला होता.

यावेळी वृत्तीक आंब्याच्या झाडावर चढुन डाहाळी तोडत असतांना विजेचा धक्का लागून खाली पडला.

यावेळी त्यास उपचारासाठी दिंडोरी येथे ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषीत केले. याबाबत वणी पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com