बिग बझारची ‘सबसे सस्ते पाच दिन’ योजना
नाशिक

बिग बझारची ‘सबसे सस्ते पाच दिन’ योजना

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । देशतील सर्वात ग्राहकप्रिय हायपर मार्केट असलेल्या बिग बझारने प्रजासत्ताकदिनाच्या औचित्यावर ‘सबसे सस्ते पाच दिन’ (एसएस 5 डी) योजना आणली असून बुधवार (दि.22) पासून योजनेला प्रारंभ होत आहे. 26 जानेवारीपर्यंत चालणार्‍या या मेगा विक्री उत्सवात ग्राहकांना विविध उत्पादने, वस्तू, कपडे अत्यंत कमी दरात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

कॉम्बो ऑफर तसेच मूळ किमतीपेक्षा घसघशीस सूट यासह दोनवर एक वस्तू मोफत अशा विविध आकर्षक योजना ग्राहकांसाठी आणल्या आहेत. किरणा माल, खाद्यपदार्थांवर दोन घ्या एक मोफत योजना असून किचन कोम्बो सेट उत्पादनांवर 50 टक्के फ्लॅट सूट देण्यात आली आहे. 13 हजार 505 चा सेट केवळ 4 हजार 999 ला खरेदी करता येणार आहे. 39 हजार 990 रुपयांचा 43 इंची कोरियो टीव्ही अवघ्या 14 हजार 999 या किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. एरिस्ट्रोक्रॅट, सफारी, स्कायबॅग्ज ब्रॅण्डच्या प्रवासाच्या ट्रॉली बॅगवर 70 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे.

ग्राहकांना हेे पाच दिवस स्वस्त आणि योजनांचा लाभ देणारी खरेदीची सुवर्णसंधी असल्याचे सांगून बिग बझारचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव नायक म्हणाले, सध्या ग्राहकांची आवड, कल आणि बदलणार्‍या पसंती ओळखून आम्ही ही सर्वात आकर्षक योजना आणली आहे. फॅशन, कपडे, दैनंदिन वापराच्या वस्तू, किराणा माल, गृहसजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी दर्जेदार, स्वस्त आणि मस्त खरेदी करण्याची यापेक्षा दुसरी संधी कुठली नसेल.

आकर्षक ऑफर
599 रुपये किमतीची लेडीज कुर्ती अवघ्या 299, छोट्या मुला-मुलींचे 299 रुपये किमतीचे टी-शर्टस् केवळ 149 रुपयांत तर पुरुषांची 599 रुपयांची डेनिम जिन्स केवळ 399 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com